पेरणीपूर्वी सावधान, बियाणे निवडा छान! (भाग- १)

डॉ. विजय शेलार, डॉ. अविनाश कर्जुले व डॉ. युवराज बालगुडे 
बियाणे तंत्रज्ञान संशोधन योजना, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी
1) काळजीपूर्वक खरेदीची आवश्‍यकता 
1)हंगामाच्या सुरवातीस शेतकऱ्यांची बियाणे मिळविण्यासाठी धावपळ
2)एकाच वाणाचा शेतकऱ्यांचा आग्रह
3)यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण केली जाते.
4)अशावेळी शेतकरी बियाणे खरेदी करताना पूरेशी काळजी घेत नाहीत
*बियाणे खरेदीची पावती न घेणे
*अनधिकृत ठिकाणावरुन काळ्या बाजारात बियाणे खरेदी करणे
*बियाणे योग्य प्रकारच्या पिशवीमध्ये किंवा बॅगमध्ये मोहोरबंद नसणे.
*सुटे बियाणे खरेदी करणे इ. प्रकार घडतात.
बियाणे पेरल्यानंतर त्यामध्ये काही दोष आढळल्यास शेतकरी त्याविरोधात तक्रार करू शकतात. परंतू शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना पूरेशी काळजी न घेतल्यामुळे त्यांना नुकसान भरपाई मिळण्यास अडचणी निर्माण होतात.
2) बियाण्याची निवड 
1)आपल्या भागात चांगल्या प्रकारे येऊ शकणाऱ्या स्थानिक वातावरणास योग्य अशा पिकाची आणि वाणाची निवड करावी.
2)यासाठी गावातील कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्र यांचेशी चर्चा करुन सर्व प्रकारच्या वाणांची चौकशी करावी.
3)तसेच जवळपासच्या कृषि सेवा केंद्रावर उपलब्ध असणाऱ्या वाणांची चौकशी करून पेरावयाच्या वाणांची निवड करावी.
4)पूर्वीच्या हंगामात इतर शेतकऱ्यांनी पेरलेल्या बियाण्याच्या अनुभवाची सुध्दा शेतकऱ्यांनी माहिती घ्यावी.
3) सुधारीत बियाणे वापरण्याचे महत्त्व 
1. प्रचलित जातीपेक्षा आधिक उत्पादन
2. प्रमुख किड व रोगांस प्रतिकारक
3. काही वैशिष्ट्‌यपुर्ण गुणधर्म
4) बियाणे कोणाकडून खरेदी करावे 
1)बियाणे मान्यताप्राप्त कृषि सेवा केंद्र, परवानाधारक विक्रेते
2)कृषि विद्यापीठ तसेच त्यांचे संलग्न कृषि संशोधन केंद्र, कृषी विज्ञान केंद्र
3)राष्ट्रीय कृषि संशोधन केंद्र,संस्था यांचे कडूनच बियाणे खरेदी करावे.
4)मध्यस्था मार्फत किंवा अनधिकृत ठिकाणावरुन बियाणे खरेदी करुन नये.
5) बियाणे खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी? 
*प्रत्येक बियाण्याच्या पिशवीवर एक टॅग (खूणचिठ्ठी) असते त्यावरील सर्व माहिती व्यवस्थित तपासून घ्यावी.
*बियाणे खरेदीचे बील/पावती दूकानदाराकडून घेणे आवश्‍यक आहे.
*बियाण्याची सर्व माहिती खरेदीच्या पावतीवर आली किंवा नाही ते व्यवस्थितपणे तपासून घेणे
*तसेच बिजोत्पादनासाठी बियाणे खरेदी करणार असाल तर त्याची स्टेज तपासून घेणे महत्वाचे आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)