घरच्या भेदींवर आधी सर्जिकल स्ट्राइक करावे

लेफ्ट.जनरल डी.बी. शेकटकर (नि.) यांचे मत


‘पाकिस्तानी दहशतवादाचे आव्हान’ विषयावर मार्गदर्शन

पुणे – दहशतवाद हे एक मानसिक युद्ध आहे. एकाला मारा आणि हजार लोकांना झोपू देऊ नका, ही त्यामागची मानसिकता असते. काश्‍मीरमधील दहशतवादाला खतपाणी घरच्या भेदींकडूनच मिळाली आहे. त्यामुळेच पाकिस्तानी दहशतवाद्यांशी मुकाबला करण्याआधी घरच्या भेदींवर सर्जिकल स्ट्राइक केले पाहिजे, असे मत लेफ्टनंट जनरल डी.बी. शेकटकर (नि.) यांनी व्यक्त केले.

प्रबोधन मंच आणि जनता बंक स्टाफ वेल्फेअर असोसिएशन यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात शेकटकर यांनी “पाकिस्तानी दहशतवादाचे आव्हान’ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी महोपौर मुक्ता टिळक, प्रबोधन मंचाचे अध्यक्ष हरिभाऊ मिरासदार, जनता सहकारी बकेचे अध्यक्ष आनंद लेले, असोसिएशनचे प्रसाद पोटधरे उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शेकटकर म्हणाले, “बंदुकीपेक्षा मानसिकता जास्त धोकादायक असते. पाकिस्तानला अणूबॉम्ब तयार करण्यासाठी आवश्‍यक पैसा सौदी अरेबिया, लिबिया आणि यूएई यांनी दिला. त्यामुळेच त्या बॉम्बवर त्या राष्ट्रांचा अधिकार आहे. मात्र हा बॉम्ब केवळ भारताविरुद्ध वापरला जाईल, अशी अट त्यावेळी घालण्यात आली आहे. भारताचा विध्वंस हीच एक मानसिकता असलेल्या पाकिस्तानशी वाटाघाटी का? असा प्रश्‍न त्याची बाजू घेणाऱ्यांनी विचारला पाहिजे.

पाकिस्तानची युद्धक्षमता इतकी कमी करावी, की त्याने भारताकडे पाहण्याची हिंमतही करू नये, असेही शेकटकर यांनी सांगितले.

पाकिस्तानची फाळणी अटळ
काश्‍मीरमधून वाहणारे सिंधू, चिनाब, रावी,सतलज, बियास, झेलम नद्यांचे पाणी मिळविणे हा पाकिस्तानचे मूळ उद्देश आहे. या नद्यांवर बंधारे-धरणे बांधली असती, तर पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती इतकी खालावली असती, की तो भारताशी शत्रुत्वाचा विचारही करू शकला नसता. त्यामुळेच या नद्यांचे पाणी अडवणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर बलुचिस्तान आणि सिंध हे मूळ पाकिस्तानचा भाग नसलेले प्रदेश त्यापासून वेगळे व्हावेत, यासाठी प्रयत्न सुरू असून येणाऱ्या काळात पाकिस्तानचे तुकडे होणे अटळ आहे, असे शेकटकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)