साताऱ्यात बीअर शॉपीच्या व्यवस्थापकाला खंडणीसाठी मारहाण

शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा; एकाला अटक

सातारा – मी करंजातला भाई आहे असे म्हणत शहरातील एका बिअर शॉपच्या व्यवस्थापकाला खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बीअर शॉपचा व्यवस्थापक राहुल गौतम ढाले (रा रविवार पेठ, सातारा) यांनी संदीप तुकाराम किर्दत, सुमित प्रकाश शेटे (दोघे रा. करंजेपेठ,सातारा) यांच्या विरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे .

-Ads-

शाहूपुरी पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, साताऱ्यातील क्रीडा संकुलाजवळ असलेल्या झिंग झिंग झिंगाट या बिअर शॉपीच्या व्यवस्थापकाला शुक्रवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास संशयित आरोपींनी तीन हजार रुपयांच्या हप्त्याची मागणी केली. त्यावर व्यवस्थापक ढाले यांनी हप्ता देण्यास नकार देत तुम्ही शॉपीच्या मालकांचा बोला अशी विनंती केली. त्यामुळे चिडलेल्या संशयित आरोपींनी ढाले यांना मारहाण करुन आम्ही कोण आहे तुला माहिती आहे का?आम्ही करंजे येथील भाई आहोत.

दर महिन्याला आम्हाला तीन हजार रुपयांचा हाप्ता द्यावाच लागेल असे म्हणून बिअर शॉपीत अनाधिकाराने घुसून व्यवस्थापकाला लाथा बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. दरम्यान गुन्हा दाखल झाल्यानंतर शुक्रवारी रात्री उशिरा शाहूपुरी पोलीसांनी संशयित सुमित शेटे याला बेड्या ठोकल्या. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार करत आहेत.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)