हजर व्हा, अन्यथा अजामीनपात्र वॉरंट; झाकीर नाईकला कोर्टाचा इशारा 

नवी दिल्ली – वादग्रस्त मुस्लीम धर्मप्रसारक झाकीर नाईक याला मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयाने दणका दिला आहे. ३१ जुलैपूर्वी कोर्टात प्रत्यक्ष हजर व्हा, अन्यथा अजामीनपात्र वॉरंट काढण्यात येईल, असा इशाराच न्यायालयाने आज दिला. याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नाईकविरोधात अजामीनपात्र वॉरंट काढण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला होता.

दरम्यान, झाकीर नाईक सध्या भारत सोडून मलेशियात आश्रयाला गेला आहे. गेल्याच महिन्यात त्याने भारतात परतण्यासाठी तयारी दर्शवली होती. परंतु त्याने एक अटही घातली होती. आपण दोषी ठरत नाही तोवर आपल्याला अटक केली जाणार नसल्याचे आश्वासन सर्वोच्च न्यायालयाने दिले तरच आपण भारतात परतण्यास तयार असल्याचे नाईकने म्हटले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)