सावधान! सूर्य आग ओकतोय…

नगर  मार्च अखेरीसच तापमानाचा पारा चाळीशी पार गेल्यानं असह्य होणाऱ्या उन्हाळ्याची चाहूल लागली असून दुपारच्या वेळी अघोषित संचार बंदी सदृश वातावरण पहायला मिळते.कडक उन्हाळा जाणवू लागल्याने नागरिकांचाही कल सकाळी उन्हं वाढायच्या आत आणि दुपारनंतर उन्हं उतरल्यावर आपापली दैनंदिन कामे करण्याकडे असतो.

सध्या तापमानाच्या पाऱ्याने 42 अंशाचा राज्यात उच्चांकी आकडा गाठल्याने शहरात ज्या भागात एरवी पाय ठेवायला जागा नसते तेथेही अघोषित संचारबंदी लावल्या सारखी स्थिती पहायला मिळते.भर गर्दीचे रस्ते कापडबाजार ,चितळे रस्ताही याला अपवाद नाहीत . नागरिकही आता उन्हात जाण्याचा प्रसंग आलाच तर टोपी,पांढरा स्वच्छ गमजा,गॉगल आणि शक्‍यतो सुती तलम कपडे ,स्कार्फ आदी लवाजम्यासह बाहेर पडतात. शहराच्या रस्त्यालगत आता शहाळी,थंडगार ताकाच्या गाड्या,उसाचा रस ,थंडगार लिंबू सरबत व अन्य थंडगार पेयांची दुकाने आणि उन्हाळी फळांची काप विकणाऱ्याची रेलचेल पहायला मिळते.त्यातल्या त्यात थंडगार ताकाला ग्राहकांची प्रथम पसंती दिसते.

शहरात ठिकठिकाणी माठांची दुकाने लागली असून थंडगार पाण्यासाठी नागरिकांची माठाच्या पाण्यालाच पसंती असते. त्यासाठी माठ खरेदी करण्यासाठीही नागरिकांची गर्दी पहायला मिळते. उन्हाळ्यात संभवणाऱ्या उष्माघाताच्या धोक्‍यापासून वाचण्यासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात विशेष कक्ष उघडण्यात आला आहे.तेथे चार खाटांचा एक वॉर्ड वातानुकुलित यंत्रणेसह सज्ज ठेवण्यात आला आहे.शिवार शासकिय रुग्णालयातून ओ आर एस पावडरची पाकिटे मोफत देण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

उन्हाळ्यात टाळण्याच्या गोष्टी

दुपारी 1 ते 3 बाहेर पडणे शक्‍यतो टाळा. 
उन्हातून आल्यावर लगेच फ्रिज मधले पाणी पिऊ नका.
मांसाहार, तेलकट व शिळे पदार्थ टाळा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)