होळी पेटवताना काळजी घ्या

अग्निशमन दल आणि महापालिकेचे आवाहन

पुणे – होळी पेटवताना दक्षता घेण्याबाबत अग्निशमन दल आणि महापालिकेतर्फे दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बुधवारी होळी पौर्णिमा असल्याने या दिवशी रात्री होळी पेटवण्यात येते. यावेळी अनेक दुर्दैवी घटना घडतात. त्या टाळण्यासाठी काही प्रतिबंधक उपाय करण्याबाबत दलातर्फे आवाहन करण्यात आले आहेत.

होळी पेटवताना त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जळाऊ पदार्थ अर्पण न करता, लहान होळी पेटवावी. ती मोकळ्या मैदानावर पेटवावी. झोपडपट्ट्या या आगीच्या दृष्टीने संवेदनशील असल्याने तेथे नाममात्र होळी पूजन करावे. लहान मुलांना होळीच्या जवळ जाऊ देऊ नये. खबरदारीची उपाययोजना म्हणून होळी पेटवण्यापूर्वी नजीक पाण्याने भरलेले लोखंडी पिंप आणि पाणी फेकण्यासाठी बादल्या उपलब्ध ठेवाव्यात. छप्पर असलेल्या जागेत, विजेच्या तारांखाली होळी न पेटवता ती उघड्या आकाशाखाली पेटवावी. होळी जोपर्यंत पेटत आहे, तोपर्यंत लहानमुलांसमवेत प्रौढ व्यक्तींनी होळीजवळ सोबत रहावे. होळीमध्ये फटाके टाकू नये. ज्या इमारतींमध्ये एलपीजी रेटिक्‍युलेटेड सिस्टिम आहे, अशा इमारतीमध्ये एलपीजी सिलिंडर बॅंकपासून दूर अंतरावर होळी पेटवावी आणि अशावेळेस बॅंकेचा काळजीवाहक कर्तव्यावर उपस्थित असणे आवश्‍यक आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)