चाहत्यांच्या प्रेमामुळेच तु मोठा खेळाडू; ‘बीसीसीआय’ने दिली विराटला समज

मुंबई  – विराटच्या खेळाला कमी लेखणाऱ्या एका चाहत्याला देश सोडून जाण्याचा सल्ला दिल्याबद्दल विराटवर टीकेचा भडिमार होत असतानाच बीसीसीआयनेही विराट कोहलीच्या त्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेताना विराट कोहलीला समज देताना सांगितले आहे की, अश्‍या क्रिकेटच्या चाहत्यांमुळेच तुम्ही मोठे खेळाडू झाला आहात. त्यांच्यामुळेच तुम्हाला पगार दिला जातो असेही बीसीसीआयने यावेळी कोहलीला सुनावले आहे.

विराटच्या फलंदाजीत विशेष असे काही नाही. त्याच्यापेक्षा मला परदेशातील काही खेळाडूंची फलंदाजी आवडते, असं मत एका चाहत्याने व्यक्त केले होते. त्याला उत्तर देताना विराटने देश सोडून जा, असे सुनावले होते. त्यासंबंधी विराट कोहलीला खुप मोठ्या प्रमाणात चाहत्यांनी ट्रोल करताना त्याला आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्याच्या सुचना देखिल केल्या गेल्या होत्या.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

त्याच बरोबर विराट टिकेचा धनी बनत असतानाच बीसीसीआयने त्याला कडक शब्दात ठणकावतात सांगितले की, ते उत्तर म्हणजे मुर्खपणाच म्हणावे लागेल. त्याने असे विधान करण्यापूर्वी विचार करायला हवा. भारतीय चाहते गुंतवणूक करतात म्हणून कोहलीला पगार मिळतो, पैसे कमावतो, हे त्याने असले वक्तव्य करण्यापूर्वी ध्यानात ठेवायला हवे. असेही बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी पुढे बोलताना सांगितले.

तसेच चालू असलेल्या वादासंदर्भात विराटला हर्ष भोगलेनेही मोलाचा सल्ला दिला आहे. हर्ष भोगलेने दोन ट्‌विट करुन यासंदर्भात विराटला समज दिली असून त्यात तो म्हणाला आहे की सत्ता व प्रसिद्धी मिळाली की माणसे तुमच्याकडे आकर्षित होतात ज्यांना तुमची मत पटतात. ते तुमची मत हिरीरीने मांडतात कारण सत्ता व प्रसिद्धीच्या संगतीमुळे त्यांनाही त्याचा लाभ मिळत असतो.

याच कारणामुळे प्रतिकूल मत मांडले की लोकांच्या भुवया उंचावतात व तुम्हाला टीका सहन करावी लागते. त्यामुळे ज्यावेळी तुम्ही चाहत्यांना रुचेल असे बोलत असता, त्यावेळी चाहते तुम्हाला डोक्‍यावर घेतात कारण त्यात त्यांचाही फायदाच असतो. मात्र, तुम्ही विरुद्ध काही बोललात, संकेत मोडलेत की तुम्हाला त्याचा रोष पत्करावा लागतो. त्यामुळे तुम्ही तुमचे मत मांडताना काही संकेत पाळावयाचे असतात असेही तो या ट्‌वीटमध्ये म्हणाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)