नवी दिल्ली – जन्म तारखेत फेरफार करून स्पर्धेसाठी नोंदणी करणाऱ्या घटनावर जबर बसावा, म्हणून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या प्रकरणातील शिक्षा क्रिकेट बंदी दोन वर्षे अशी वाढवली आहे. या अगोदर यासाठी एक वर्षे क्रिकेट बंदी अशी शिक्षा होती. बीसीसीआय वायचोरी प्रकरणात कोणत्याही प्रकाराची सूट देऊ इच्छित नाही. त्यांचे नियम खूप कठोर करून अशे प्रकरणे घडू नयेत यांच्याकडे बीसीसीसीआयचा कल आहे.
सप्टेंबरमध्ये दिल्लीचा खेळाडू जसक्रित सिंग सचदेव वयचोरी प्रकरणात दोषी आढळला होता. 19 वर्षाखालील विश्वचषकात खेळण्यासाठी त्याने आपले वय कमी दाखवन्याचा प्रयत्न केला होता.
वयचोरी प्रकाच्या अनेक घटना ज्युनिअर क्रिकेटमध्ये होत असतात. भारताचा माजी खेळाडू राहुल द्रविड याने देखील हे प्रकार होत असतात याची काबूली दिली होती. ‘एका खेळाडूला फक्त एकदाच 19 वर्षाखालील विश्वचषकात खेळण्याची संधी’ या बीसीसीआयच्या निर्णयाचे स्वागतही केले होते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा