‘बत्ती गुल मीटर चालू’ चित्रपटाचा ट्रेलर आउट

मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेला नारायण सिंह यांनी दिग्दर्शित ‘बत्ती गुल मीटर चालू’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात शाहीद कपूर, श्रद्धा कपूर, यामी गौतमी आणि दिव्येंदू शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

बत्ती गुल मीटर चालू’ या चित्रपटात शाहीद कपूर वकिलाची भूमिका करत असून दिव्येंदू शर्मा त्याचा मित्र दाखविला आहे. तर यामी गौतमीही वकिलाच्या भूमिकेत असून शाहीद कपूरविरुद्ध लढताना दिसणार आहे.

-Ads-

दिव्येंदूची एक छोटीशी फॅक्टरी असून याचे वीजबिल लाखोच्या घरात आलेले असते. यामुळे दिव्येंदू निराश होऊन आत्महत्या करतो. या घटनेने शाहीदला मानसिक धक्का लागतो. आणि शहीद इलेक्ट्रिसिटी कंपनीच्या विरुद्ध केस लढविण्याचे ठरवितो, असे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे. दरम्यान, हा चित्रपट २१ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)