बॅटने मारहाण करणाऱ्या आमदाराची भाजपमधून हकालपट्टी?

पंतप्रधानांचे संकेत

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भाजपच्या संसदीय बैठकीमध्ये आकाश विजयवर्गीय यांच्याकडून अधिकाऱ्याला करण्यात आलेल्या मारहाणीचा तीव्र शब्दांमध्ये निषेध नोंदवला. पंतप्रधानांनी या वेळी बोलताना आकाश विजयवर्गीय यांच्या पक्षातून हकालपट्टीचे देखील संकेत दिले. ते म्हणाले, “जर आपल्याला आपला एक आमदार गमवावा लागला तरी कबूल मात्र अशा घटनांची पुनरावृत्ती नकोच.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत आज आपल्या निवासस्थानी भाजपच्या 80 नेत्यांची एक बैठक आयोजित केली असून या बैठकीद्वारे ते भाजपने त्यांना शिस्तप्रिय वर्तनाचे धडे देणार आहेत.

तत्पूर्वी, गेल्या आठवड्यात मध्य प्रदेशातील इंदूर येथील भाजपचे आमदार आकाश विजयवर्गीय यांनी अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना अक्षरशः बॅटने बदडून काढले होते. आकाश हे भाजपचे ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांचे पुत्र आहेत. आकाश यांनी केलेल्या या मारहाणीनंतर त्यांना अटक देखील करण्यात आली होती मात्र त्यांची सुटका होताच त्यांचे स्वागत एखाद्या हिरो प्रमाणे करण्यात आले. त्यांचे वडील कैलास विजयवर्गीय यांनी स्वतः आकाश यांच्या गळ्यात हार घालत त्यांचे तुरुंगातून बाहेर आल्याबद्दल स्वागत केले होते. आकाश विजयवर्गीय यांनी आपल्या कामाच्या पद्धतीबद्दल बोलताना, “पहिले आवेदन फिर निवेदन फिर दना-दन” अशी विक्षिप्त भूमिका मांडली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)