बास्केटबॉल स्पर्धा: औपुणे, उत्तर मुंबई दोन्ही गटांत उपान्त्य फेरीत

राज्य अजिंक्‍यपद व आंतरजिल्हा बास्केटबॉल स्पर्धा

पुणे: पुणे व उत्तर मुंबई या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करताना येथे सुरू असलेल्या राज्य अजिंक्‍यपद व आंतरजिल्हा बास्केटबॉल स्पर्धेतील मुले व मुली अशा दोन्ही गटांमध्ये उपान्त्य फेरीत धडक मारली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तेरा वर्षांखालील मुलांच्या गटांत बीड व आग्नेय मुंबई या संघांनीही उपान्त्य फेरी गाठली असून तेरा वर्षांखालील मुलींच्या गटांत नाशिक आणि नागपूर या संघांनी अखेरच्या चार संघांमध्ये स्थान मिळविले आहे. म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्रीशिवछत्रपती क्रीडानगरीत ही स्पर्धा सुरू आहे.

तेरा वर्षांखालील मुलांच्या उपान्त्यपूर्व लढतीत पुण्याने अमरावतीचा 58-32 असा एकतर्फी पराभव केला. मध्यंतराला पुण्याकडे 31-14 अशी आघाडी होती. कर्णधार कुणाल भोसलेने 24 गुणांची कमाई करताना पुण्याच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. आर्यन लिमयेने 8 व अन्वित शिंदेने 6 गुण नोंदवीत त्याला सुरेख साथ दिली.

पुण्याने मध्य मुंबईचा 60-19 असा धुव्वा उडविताना तेरा वर्षांखालील मुलींच्या गटांतही उपान्त्य फेरी गाठली. मध्यंतराला पुण्याकडे 34-10 अशी आघाडी होती. दिव्या सेठियाने 20, तर तन्वी साळवेने 8 गुण नोंदवीत पुण्याच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

उत्तर मुंबई संघाने तेरा वर्षांखालील मुलांच्या गटांत कोल्हापूरचा 62-17 असा फडशा पाडताना उपान्त्य फेरी गाठली. मध्यंतराला विजयी संघाकडे 25-8 अशी आघाडी होती. देव प्रेमीने 24, तर आगम जैनने 8 गुण नोंदवीत उत्तर मुंबईकडून चमकदार कामगिरी केली. कोल्हापूरकडून यशवर्धन जाधवने 11 गुणांची कमाई करीत एकाकी झुंज दिली.

उत्तर मुंबईने तेरा वर्षांखालील मुलींच्या गटांतही कोल्हापूरचा 41-30 असा पराभव करून उपान्त्य फेरीत धडक मारली. एलिशा फर्नांडिस व रिचा पद्मनाभन यांनी प्रत्येकी 9 गुण नोंदविताना विजयात मोलाचा वाटा उचलला. कोल्हापूरकडून आदिती पाडगावकरने 18, तर पूर्वा भोसलेने 6 गुण नोंदवीत कडवी झुंज दिली. मध्यंतराला विजयी संघाकडे 26-11 अशी आघाडी होती.

मुलींच्या गटातील आणखी एका लढतीत नाशिकने साताऱ्याचे आव्हान 41-39 असे मोडून काढले. सिमरन भंवरने 16 व साक्षी जयसिंघानीने 7 गुण नोंदवीत नाशिकला विजय मिळवून दिला. साताऱ्याकडून गायत्री जयदेवकरने 12, तसेच प्रज्ञा नलावडेने 8 गुण नोंदवीत दिलेली झुंज अपयशी ठरली. मुलींच्या गटातील अखेरच्या उपान्त्यपूर्व लढतीत नागपूरने औरंगाबादचा 46-12 असा धुव्वा उडविला. समीक्षा चांडकने 11 तर धारा फाटेने 8 गुण नोंदवीत विजयात मोलाचा वाटा उचलला. पराभऊत संघाकडून अनन्या मेहताने 7 गुणांची नोंद केली.

मुलांच्या गटात बीडने टाण्याचा 72-47 लअसा पराभव करीत उपान्त्य फेरी गाठली. साहिल धनवटेने 33 व अझमत खानने 15 गुण नोंदवीत बीडला एकतर्फी विजय मिळवून दिला. ठाण्याकडून सक्षम सोनावणे व कार्तिक नायर यांनी प्रत्येकी 11 गुण नोंदवीत झुंज दिली. मुलांच्या गटातील अखेरच्या उपान्त्यपूर्व लढतीत आग्नेय मुंबईने मध्य मुंबईचा 41-19 असा एकतर्फी पराभव केला. रय्यान शेखने 14, तर इयाझ शेखने 12 गुण नोंदवीत आग्नेय मुंबईला विजय मिळवून दिला. मध्य मुंबईकडून सचिन पटेलने 6 व अय्यान शेखने 5 गुण नोंदवीत कडवी झुंज दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)