विद्यांचल, अभिनव, बालाजी बास्केटबॉल क्‍लबची आगेकूच

पुणे  -मुलांच्या गटातील विद्यांचल, अभिनव, बालाजी बास्केटबॉल क्‍लब, मिस्चीफ मेकर्स, बीएनएस अ आणि विद्या व्हॅलीच्या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करत येथे होत असलेल्या आठव्या महादेवराव निम्हण स्मृती करंडक बास्केटबॉल स्पर्धेत विजयी आगेकूच नोंदवली.

यावेळी मुलांच्या गटातील पहिल्या सामन्यात विद्यांचलच्या संघाने बी. एन. एसच्या ब संघाचा 47 विरुद्ध 10 अशा फरकाने पराभव करत आगेकूच केली. यावेळी विद्यांचल संघातर्फे कुनाल भोसलेने 10 गुण करत विजयात मोलाचा वाटा उचलला. तर, बी. एन. एस ब संघाच्या आशन गोखलेने 4 गुण करत प्रतिकाराचा प्रयत्न केला. तर, दुसऱ्या सामन्यात अभिनवच्य संघाने विस्डम वर्ल्डच्या संघाचा 33 विरुद्ध 26 अशा फरकाने पराभव करत आगेकूच केली. अभिनवच्या अभिषेक माळीने 9 गुण करत संघाला विजय मिलवून दिला. तर, विस्डम वर्ल्डच्या ओम गिरासेने 11 गुण करत एकाकी लढत दिली.

यावेळी झालेल्या तिसऱ्या सामन्यात बालाजी बास्केटबॉल क्‍लबच्या संघाने मिस्चिफ मेकर्सच्या ब संघाचा 51 विरुद्ध 19 असा पराभव करत आगेकूच केली. यावेळी बालाजी बास्केटबॉल क्‍लबच्या युवन गरवारेने 24 गुण करत संघाला विजय मिळवून दिला. तर, मिस्चिफ मेकर्सच्या ब संघातील यश गांधीने 7 गुण केले. मिस्चिफ मेकर्सच्या अ संघाने कल्यानी स्कूलचा 35 विरुद्ध 15 असा पराभव करत आगेकूच केली. तर, पाचव्या सामन्यात बी. एन. एस. एअच्या अ संघाने मित्र मंडलच्या संघाचा 28 विरुद्ध 16 अशा फरकाने पराभव करत आगेकूच केली. अखेरच्या सामन्यात विद्या व्हॅलीच्या संघाने फाल्कनच्या संघाचा 35 विरुद्ध 33 गुणांच्या फरकाने संघर्षपूर्ण पराभव करत आगेकूच केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)