सीईटीसाठी मूळ ओळखपत्र अनिवार्य

राज्य सीईटी सेल केली उमेदवारांना सूचना

पुणे – उच्च शिक्षण विभागाच्या बीपीएड, बीएड, एमएड, बीए अथवा बीएस्सी बीएड, विधी या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी सीईटी अर्थात प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहे. या ऑनलाइन सीईटीसाठी वेळेपूर्वी उपस्थित राहा आणि परीक्षेसाठी मूळ (ओरिजनल) ओळखपत्र असल्याशिवाय सीईटी परीक्षेला बसून दिले जाणार नसल्याचे राज्य सीईटी सेल स्पष्ट केले आहे.

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (राज्य सीईटी सेल) आजपासून सीईटी घेण्यात येत आहे. उच्च शिक्षण विभागाच्या ऑनलाइन सीईटीसाठी राज्य सीईटी सेलने उमेदवारांसाठी सूचना केल्या आहेत. मंगळवारी बीपीएड अभ्यासक्रमासाठी सीईटी झाली. परीक्षेला येताना उमेदवारांनी मूळ ओळखीच्या पुराव्यासाठी हॉल तिकीटावरील कोणतेही एक मूळ ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक आहे. मूळ ओळखपत्राच्या पुराव्या ऐवजी त्यांच्या छायांकित (झेरॉक्‍स) प्री अथवा कलर झेरॉक्‍स अथवा सॉप्ट कॉपी, मोबाइलमधील चित्र अन्य कोणत्याही प्रकारचा पुरावा ग्राह्य धरला जाणार नाही. या उमेदवारास परीक्षेस प्रवेश नाकारण्यात येणार असल्याचे राज्य सीईटी सेलचे आयुक्‍त आनंद रायते यांनी सांगितले.

परीक्षेला येण्यापूर्वी मूळ ओळखपत्र व फोटो चिकटवलेले हॉल तिकीट शिवाय केंद्रावर येणाऱ्या उमेदवारास व परीक्षा केंद्रावर वेळेवर न पोहोचणाऱ्या उमेदवारास प्रवेश दिला जाणार नाही. तसेच, मूळ ओळखपत्र व हॉल तिकीटाच्या नावामध्ये काही विसंगती आढळल्यास, चुकीचे नाव असल्यास अशा उमेदवारांना संबंधित अभ्यासक्रमाच्या सीईटीला प्रवेश नाकारला जाईल, असेही रायते यांनी नमूद केले आहे. त्याचप्रमाणे नाव बदल केल्याचे मूळ शपथपत्र परीक्षा केंद्रावर दाखविल्यास त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाईल, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)