बोगस कागदपत्रांच्या आधारे 125 आरोपींची जामिनावर सुटका 

मुंबई: कल्याण, उल्हासनगर आणि ठाणे येथील न्यायालयात 125 पेक्षा अधिक आरोपींना बोगस कागदपत्रांच्या आधारे जामिन देऊन सुटका करण्यात आल्याची धक्कादायक माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. याप्रकरणी कल्याणच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून 8 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

गेल्या ऑक्‍टोबर महिन्यात ही बाब उघडकीस आल्यानंतर ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने याप्रकरणातील आरोपींवर कारवाई केली असून विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या ताब्यातून शासकिय कार्यालये व विविध ग्रामपंचायतींचे असे एकूण 45 रबरी शिक्के, बनावट शिधापत्रिका आणि ग्रामपंचायत टॅक्‍स पावती जप्त केली आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)