स्थूल मधुमेहींसाठी बॅरियाट्रिक सर्जरी (भाग २)

स्थूल मधुमेहींसाठी बॅरियाट्रिक सर्जरी (भाग १)

या अभ्यासामध्ये स्थूल आणि अनियंत्रित टाईप- 2 मधुमेह असणाऱ्या आशियाई भारतीय रुग्णांकरिता वैद्यकीय औषधोपचार आणि जीवनशैलीमध्ये बदल यांच्यापेक्षा बॅरियाट्रिक सर्जरी हा उपाय अधिक प्रभावी ठरू शकेल असे निष्पन्न झाले आहे.
कॉस्मिड (कम्पॅरिझन ऑफ सर्जरी व्हर्सस मेडिसिन फॉर इंडियन डायबिटिस) ट्रायल हा पहिला रॅंडमाईझ्ड कंट्रोल्ड अभ्यास आहे. या अभ्यासामध्ये कॉकेशियन लोकांच्या तुलनेत तरुण वयातच टाईप- 2 मधुमेह होणाऱ्या आणि कमी बीएमआय असणाऱ्या आशियाई भारतीय लोकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

या ट्रायलअंतर्गत गॅस्ट्रिक बायपास सर्जरी करून घेतलेल्या रुग्णांपैकी एक रुग्ण गेली 7 वष्रे मधुमेहाने ग्रस्त असलेली 42 वर्षाची महिला होती. तिचे वजन 82 किलो होते आणि तिला इन्शुलिनवर जगावे लागायचे. पेशाने शिक्षिका असल्याने आणि या व्याधी असल्याने तिच्या प्रवासावर मर्यादा यायच्या.

8 तास काम करणे अवघड व्हायचे. वारंवार होणारा हायपोग्लिसेमिया आणि अस्वस्थपणा यांनी तिची नोकरी जाण्याच्या बेतात होती. या सगळ्याची परिणती म्हणून तिला न्यूरोपथी आणि किडनीचा आजारही जडला. गॅस्ट्रिक बायपास करून घेतल्यानंतर तिला मधुमेहाचे कोणतेही उपचार घ्यावे लागलेले नाहीत.

तिला आता जास्त उत्साही वाटते आणि तिची किडनीही उत्तम काम करते आहे. ती म्हणते, माझ्या मधुमेहाने निर्माण होणा-या समस्या दिवसेंदिवस वाढतच चालल्या होत्या आणि त्यामुळे मला माझ्या मुलांबद्दल काळजी वाटून असहाय्य वाटत हेते. गॅस्ट्रिक बायपासने फक्‍त मलाच नव्हे तर, माझ्या कुटुंबाला देखील वाचवले आहे.

बॅरियाट्रिक सर्जरी हा उच्च बीएमआय किंवा बॉडी मास इंडेक्‍स असणा-या लोकांकरिता किंवा स्थूल वर्गवारीमध्ये मोडणा-या लोकांकरिता कायमस्वरूपी वजन कमी करण्याचा प्रभावी मार्ग समजला जातो. यापूर्वी फक्त अतिस्थूल रुग्णांवरच बॅरियाट्रिक सर्जरी केली जायची, पण स्थूलत्वाशी संबंधित मधुमेह असणा-या भारतीय रुग्णांकरिता ही उपचार योजना वापरता येऊ शकते आणि भारतीय स्थूल मधुमेहींना त्यांच्या वजन नियंत्रणाखाली आणून मधुमेह आटोक्‍यात ठेवण्यात मदत करता येऊ शकते.

कॉस्मिड हा फक्त मधुमेहावरील उपचार योजना म्हणून गॅस्ट्रिक बायपासचा वापर करणारा जागतिक स्तरावर पहिलावहिला अभ्यास आहे. दोन वष्रे चाललेल्या या अभ्यासामध्ये 80 रुग्णांना सामील करून घेतले होते.
टाईप- 2 मधुमेह असणा-या लोकांवर उपचार करण्याकरिता गॅस्ट्रिक बायपास सर्वसाधारण वैद्यकीय उपचारांपेक्षा कितीतरी जास्त प्रभावी ठरते असे या अभ्यासातून समोर आले आहे. या अभ्यासाने मधुमेह व्यवस्थापनाबद्दलचे विचारच बदलून टाकले आहे. या अभ्यासातून समोर आलेल्या निष्कर्षामुळे सर्वसाधारण औषधांनी बरा न होणारा टाईप-2 मधुमेह असलेल्या रुग्णांना प्रभावी उपचार मिळू शकतील.
डॉ. शशांक शाह 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)