बडोदा बॅंक विलीनीकरणास लागणार दोन वर्षे

नवी दिल्ली – देना बॅंक आणि विजया बॅंक यांच्या विलीनीकरणामुळे बॅंक ऑफ बडोदा देशातील तिसऱ्य़ा क्रमांकाची बॅंक ठरली आहे. पण या विलीनीकरणास दोन वर्षाचा कालावधी लागणार असल्याचे बॅंकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्य़ांकडून सांगण्यात आले आहे.

एक एप्रिलपासून देना बॅंक, विजया बॅंक आणि बडोदा बॅंकेची विलीनीकरण प्रक्रिया सुरू झाली आहे. तथापि, या प्रक्रियेची प्रत्यक्ष कारवाई करण्यास दीर्घकाळ लागणार आहे. तिन्ही बॅंकांचे आयटीसंबंधी कामकाज एकत्रित करण्यास किमान एक वर्षाचा कालावधी लागण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर अन्य विलीनीकरण कारवाई पूर्ण करण्यासाठीही एक वर्ष लागणार आहे, असे बॅंक अधिकाऱ्य़ांकडून सांगण्यात आले आहे.

दैनंदिन कामकाज आणि व्यवस्थापनात अधिकाधिक व्यावसायिकता आणण्यासाठी बॅंकेचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे संचालक मंडळाची कार्यक्षमता नियमित तपासण्यात येणार असून त्यासाठी सल्लागार कंपन्यांकडून निविदा मागविण्यात येणार आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here