“बार्गेनिंग पॉलिटिक्‍स’ला कर्जतकर विटले

किरण जगताप
कर्जत – विधानसभा निवडणुकीत नित्याने चालत आलेल्या बार्गेनिंग पॉलिटिक्‍सचा कर्जत तालुक्‍यातील युवकांना वीट आल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपाचे मंत्री असलेल्या प्रा. राम शिंदे यांच्याविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी दंड थोपटल्याने या लढतीकडे राज्याचे लक्ष लागून राहणार आहे. निवडणुकीची जोरदार मोर्चेबांधणी सुरू असून, काटे की टक्कर होणार असल्याने तालुक्‍यातील काही पुढारी मात्र आपला भाव वाढविण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. याचा कर्जत तालुक्‍यातील युवा पिढीला वीट आला असून, कार्यकर्ते सोशल मीडियातून आता भडक प्रतिक्रिया देऊ लागले आहेत.

व्यापक दृष्टिकोनाचा अभाव आणि पक्षांतर्गत कुरघोड्या होत असल्याने तालुक्‍यातील नेते केवळ जिल्हा परिषद गटापुरते मर्यादित राहिले आहेत. तर काही आपल्याकडे असलेल्या कार्यकर्त्यांच्या याद्या दाखवून आपले मार्केट वाढवण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर काही गाव पुढाऱ्यांनी पाच-दहा कार्यकर्ते घेऊन इच्छूक उमेदवाराच्या भेटीचा फंडाही राबविला आहे.

कर्जत तालुक्‍यातील पुढाऱ्यांच्या जोरावर निवडणुकीला सामोरे गेल्यास पराभव अटळ असल्याचे विचार सोशल मीडियातून व्यक्त होत आहेत. पुढाऱ्यांच्या विकाऊपणाबद्दलही कार्यकर्ते व युवा पिढी खुलेआम बोलू लागली आहे. यापूर्वी झालेल्या निवडणुकांची उदाहरणे त्यांच्याकडून दिली जात आहेत. कोणा पुढाऱ्यांकडून मार्केटिंगसाठी आपला वापर होणे हे कार्यकर्ते मान्य करताना दिसत नाहीत. त्यामुळे उमेदवारांना पुढाऱ्यांच्या भरवशावर न राहता कार्यकर्त्यांपर्यंत पोचण्याचे मोठे आव्हान आहे. पालकमत्र्याकडे गावागावात कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण झाल आहे. मात्र रोहित पवार यांना कार्यकर्त्यांबरोबरच आपली स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची आवश्‍यकता अधोरेखित होत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)