आमदार कन्येला वाटतेय ऑनर किलिंगची भिती

मुलगी प्रौढ असून तिला तिचे निर्णय घेण्याचा अधिकार – आ. राजेश मिश्रा

बरेली – उत्तर प्रदेशच्या बरैली जिल्ह्यातील बिठारी चेनपूरचे आमदार राजेश मिश्रा यांची मुलगी साक्षी मिश्राने सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला आहे. तीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये साक्षीने दलित तरुण अजितेश कुमारशी लग्नाची घोषणा केली आहे. तसेच आपले कुटुंब आणि वडिलांना अशी विनंती केली आहे की तिच्या घरच्यांशी हे लग्न स्वीकारावे आणि आम्हाला शांततेने जगू द्यावे. तिने असाही आरोप केला आहे की तिच्या घरच्यांनी तिच्या मागावर गुंड पाठवले आहेत ज्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, आपल्या मुलीचे आरोप चुकीचे असून ती प्रौढ आहे आणि तिला तिचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे, असे आ. मिश्रा यांनी स्पष्ट केले आहे.

साक्षीचे वडील आमदार राजेश कुमार मिश्रा यांनी एका निवेदनाद्वारे आपले म्हणणे मांडले आहे. त्यांनी दिलेले निवेदनात ते म्हणाले आहेत की, माझ्या विरोधात प्रसारमाध्यमांमध्ये सुरू असलेल्या गोष्टी चुकीच्या आहेत. माझी मुलगी प्रौढ आहे. तिला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मी कुणालाही जीवे मारण्याची धमकी दिलेली नाही. तसेच माझ्या कोणत्या माणसानेही, अथवा माझ्या कुटुंबातील कुणीही तशी धमकी दिलेली नाही. मी आणि माझे कुटुंब कामात व्यग्र आहोत. मी जनतेचे कार्य करत आहे, तसेच भारतीय जनता पक्षाची सदस्यता मोहीम राबवत आहे. माझ्याकडून कुणालाही कोणताही धोका नाही.

मिश्रा यांनी हे निवेदन प्रसिद्ध केल्यानंतर साक्षीने आणखी एक व्हिडिओ जारी केला. त्यात मला आणि माझ्या पतीच्या जीवाला माझे वडील आणि भाऊ विक्की आणि वडिलांचे सहकारी यांच्याकडून धोका आहे, असे म्हटले आहे. तिने तशी तक्रारच बरेलीच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. तिने पुन्हा एकदा सुरक्षेची मागणी केली आहे. हे सर्वजण मिळून आपली आणि आपल्या पतीची हत्या करू इच्छितात, असा थेट आरोपच साक्षीने केला आहे. बरेलीचे खासदार आणि मंत्र्यांनी आपले वडील, भाऊ आणि त्यांच्या सहकाऱ्याची मदत करू नये, असे आवाहनही तिने खासदार आणि मंत्र्यांना केले आहे.

दरम्यान, साक्षी आणि तिच्या पतीला सुरक्षा देण्यात यावी असे निर्देश बरेलीच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांना देण्यात आल्याचे बरेलीचे पोलीस उप महानिरीक्षक आर. के. पांडे यांनी सांगितले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)