बार्सेलोना स्पॅनीश सुपरकप विजेते!!!

Soccer Football - Spanish Super Cup - Barcelona v Sevilla - Grand Stade de Tanger, Tangier, Morocco - August 12, 2018 Barcelona's Lionel Messi lifts the trophy as he celebrates winning the Spanish Super Cup with team mates REUTERS/Jon Nazca TPX IMAGES OF THE DAY

स्पॅनीश सुपर कपमध्ये फुटबॉल क्लब बार्सेलोनाने सेव्हिला संघाचा २-१ असा पराभव करत स्पॅनीश सुपरकप आपल्या नावे केला. सामन्यातील पहिला गोल सेव्हिलासाठी ९ व्या मिनिटाला पी. सराबिया याने केला. त्यानंतर ४२ व्या मिनिटाला बार्सेलोनाच्या गेरार्ड पिके याने ४२ मिनिटाला तर ओस्माने डेम्बले याने ७८ व्या मिनिटाला गोल करत करत बार्सेलोनाला आघाडी मिळवून दिली. अतिरिक्त वेळेत सेव्हिला संघाला पेनल्टी मिळाली होती परंतु बार्सेलोनाचा गोलकीपर मार्क टेर स्टेगन याने पेनल्टी वाचवत बार्सेलोनाच्या विजयावर शिक्का मोर्तब केला.

पहिल्या सत्रातच खेळ सुरु झाला तेव्हा बार्सेलोनाने बॉल आपल्याकडे ठेवण्यावर भर दिला. परंतु काऊंटर अटॅकवर उत्तम चाल रचत सिव्हिलाने पहिला गोल नोंदवला. हा गोल  ९ व्या मिनिटाला पी. सराबिया याने केला. त्यानंतर बार्सेलोना संघाकडून बरोबरी साधण्याचे अनेक प्रयन्त झाले पण त्यांना ४२ व्या मिनिटापर्यंत यश आले नाही. ४२ व्य मिनिटाला बार्सेलोनाचा कर्णधार लियोनेल मेस्सीने फ्री किकचा फटका मारला त्यावेळी फुटबॉल गोलपोस्टला लागून परत आला. त्यावर बार्सेलोनाच्या पिकेने सर्वात अगोदर पोहचून गोलजाळ्यात ढकलला. ४२व्या मिनिटाला बार्सेलोनानारे सामनात १-१ अशी बरोबरी साधली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दुसऱ्या सत्रात देखील जास्त वेळ बॉलचा ताबा बार्सेलोना संघाकडे होता. तर कॉउंटर अटॅकवर पुन्हा गोल करण्याच्या प्रयत्नात सेव्हिलाचा संघ होता. ७८ व्या मिनिटाला बार्सेलोनाच्या ओस्माने डेम्बले याने एक जबरदस्त फटका गोलवर मारला. हा फटका थोपवण्यात सेव्हिलाच्या गोलकीपरला अपयश आले. अनपेक्षित कोनातून गोल करत  ओस्माने डेम्बले याने बार्सेलोना संघाला २-१ शी आघाडी मिळवून दिली.

अतिरिक्त वेळेत सेव्हिला संघाला पेनल्टी मिळाली होती परंतु बार्सेलोनाचा गोलकीपर मार्क टेर स्टेगन याने  डावीकडे झेपवत पेनल्टी वाचवली आणि  बार्सेलोनाच्या विजयावर शिक्का मोर्तब केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)