बार्सिलोना उपांत्यपूर्व फेरीत दाखल; लियोनाल मेस्सीचे दोन गोल

नवी दिल्ली – लियोनवर मोठा विजय मिळवण्यात दोन गोलचे योगदान देत लियोनाल मेस्सीने बार्सिलोनाला चॅम्पियन्स लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचवले. दोन गोल स्वत: करतानाच मेसीने दोन गोलसाठी चाली रचत 5-1 असा मोठा विजय मिळवून दिला. फ्रान्समध्ये दोन्ही संघादरम्यान झालेला पहिला सामना गोलशून्य बरोबरीत राहिला होता. त्यामुळे लियोनला या सामन्यात चांगली संधी होती. परंतु, मेस्सी आणि त्याच्या सहकाऱ्यांनी लियोनच्या अपेक्षांवर पानी फेरले.

मेस्सीने 17 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर आणि 78 व्या मिनिटाला मैदानी गोल केला. या सामन्यातील दोन गोलमुळे मेस्सीचे चॅम्पियन्स लीगमध्ये 108 गोल झाले आहेत. या यादीत 124 गोल करणार्या ख्रिस्तीयानो रोनाल्डोच्या पाठोपाठ त्याचा दुसरा क्रमांक आहे. सामन्यातील अन्य तीन गोल फिलीप कोटिन्हो (31 व्या मिनिटाला), गेरार्ड पिके (81 व्या मिनिटाला) आणि ओस्माने डेम्बेले (86 व्या मिनिटाला) गोल केले. लियोनकडून एकमेव गोल लुकास टोसार्ट याने 58 व्या मिनिटाला केला. चॅम्पियन्स लीगमध्ये बार्सिलोना हा एकमेव स्पॅनिश क्‍लब असणार आहे. त्याच्या जोडीला रोनाल्डोचा जुवेंटस्‌, मॅंचेस्टर युनायटेड, मॅंचेस्टर सिटी, लिव्हरपूल, टोटेनहॅम हॉटसपर, पोर्टो आणि अजाक्‍स हे क्‍लब अंतिम आठमध्ये पोहोचले आहेत.

-Ads-

सामन्याच्या 17व्या मिनिटालाच मेसीने पहिला गोल लगावत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर फिलीप कुटिन्होने 31 व्या मिनिटाला अजून एक गोल लगावत संघाच्या आघाडीत भर घातली. त्यामुळे पूर्वार्धातच बार्सिलोना संघाकडे विजयी आघाडी जमा झाली. उत्तरार्धात 58व्या मिनिटाला लिऑनच्या लुकास उसार्टने पहिला गोल करीत ही आघाडी कमी केली. मात्र, 78व्या मिनिटाला मेसीने त्याचा दुसरा आणि संघाचा तिसरा गोल नोंदवला. जेरार्ड पिकने 81 व्या मिनिटाला तर उस्मान डेम्बलेने 86 व्या मिनिटाला गोल लगावत बार्सिलोनाला 5-1 असा दणदणीत विजय मिळवून दिला.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)