बापटांचा स्नेहमेळावा तर शिरोळेंच्या भेटीगाठी

भाजप उमेदवारीचा सस्पेंस कायम ? 

पुणे – लोकसभा निवडणूकीचे वातावरण तापू लागले असतानाच; दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीची माळ नेमकी कोणाच्या गळयात पडणार याबाबत सस्पेंन्स अद्यापही कायम आहे. पुण्यासाठी पालकमंत्री गिरिष बापट आणि विद्यमान खासदार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. मात्र, त्याच वेळी शिरोळे यांच्याकडून उमेदवारी बाबत कोणतेही जाहीर भाष्य केले जात नसल्याने तसेच बापट यांनीही आपण उमेदवार नसल्याचे जाहीरपणे सांगण्यात येत नसल्याने भाजपच्या उमेदवारीबाबत सस्पेंस कायम आहे.

राज्यातील लोकसभा निवडणूकीत भाजपचे राज्यातील 11 विद्यमान उमेदवार डेंजरझोन मध्ये असल्याचे वारंवार सांगितले जात आहे. त्यात पुण्यातील विद्यमान खासदार शिरोळे यांच्याही नावाचा समावेश असल्याचे चर्चा आहे. त्यातच; पालकमंत्री गिरिष बापट यांनीही उमेदवारीसाठी जोर लावला जात असून पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून खासगीत बापट यांचे नाव घेतले जात आहे. लोकसभा निवडणूकीच्या आचारसंहितेपूर्वी बापट यांनी थेट नागपूर गाठत केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत; लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर आपला कार्यअहवाल प्रकाशित केला आहे. मात्र, या कार्य अहवालामागे थेट उमेदवारीची मागणी केली असल्याची चर्चा आहे. त्यानंतर बापट यांनीही आपण उमेदवार नाही असे कधीच सांगितले नाही तसेच पक्ष देईल ती जबाबदारी घेण्यास आपण तयार असल्याचे सांगितले.

गेल्या तीन-चार दिवसात भाजपमध्ये पुण्याच्या उमेदवारी बाबत हालचाली सुरू झाल्याने बापट पुन्हा सक्रीय झाले असून त्यांनी आपल्या कार्य अहवालाच्या प्रकाशनासाठी नुकताच कार्यकार्ता मेळावा घेतला आहे. त्यात काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनाच निमंत्रण देण्यात आले होते. त्यानंतर आता बापट यांनी आपली ही संपर्क मोहीम अधिक तीव्र केली असून प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, प्रतिष्ठीत नागरीक यांचे स्नेह मेळावे घेतले जात आहेत. त्यात कार्य अहवालाची माहिती दिली जात आहे. प्रत्यक्षात ही लोकसभा निवड्‌णूक असल्याने बापट आपल्या अहवालाचे प्रकाशन या निवडणूका नंतरही करू शकतात. मात्र, लोकसभेसाठी प्रबळ दावेदार असलेल्या बापट यांच्याकडून या मध्यमातून शक्ती प्रदर्शन केले जात असल्याचे बोलले जात आहे.

दुसऱ्या बाजूला विद्यमान खासदार शिरोळेही सक्रीय झाले आहे. त्यांच्याकडून आमदार तसेच, नगरसेवकांच्या भेटीगाठी घेतल्या जात आहेत. त्यासाठी शिरोळे यांनीही वैयक्तिक भेटीगाठीवर भर दिला जात असल्याचा त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगितले जात आहे. गेल्या काही दिवसात शिरोळे यांनी बहुतांश नगरसेवकांच्या कार्यक्रमांना हजेरी लावली असून त्यांच्याकडून पाठिंबा मिळविला जात आहे. त्यामुळे शिरोळे यांनीही आपला दावा सोडलेला नसल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे एका बाजूला पुण्याची उमेदवारी कोणाला मिळणार याचे तर्क वितर्क लढविले जात असतानाच या दोन्ही नेत्यांनी पाठिंब्यासाठी कंबर कसली असल्याचे चित्र आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)