“सिख फॉर जस्टीस’वर केंद्र सरकारकडून बंदी 

भारत-इंग्लंड सामन्याच्यावेळी खलिस्तानी दहशतवाद्याची हजेरी

नवी दिल्ली – लंडनमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेत 30 जून रोजी झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंडच्या सामन्याच्यावेळी स्टेडियममध्ये खलिस्तानवादी “वॉन्टेड’ दहशतवादी परमजीत सिंग उर्फ पम्मा आपल्या “सिख फॉर जस्टीस’च्या सहकाऱ्यांसमवेत उपस्थित होता, असे गृहमंत्रालयातील सूत्रांनी सांगितले आहे.

“सिख फॉर जस्टीस’ या संघटनेवर आज केंद्र सरकारने बंदी घातली. पंजाबसह अन्य काही राज्य सरकारांशी केलेल्या चर्चेनंतर अणि “एसएफजे’च्या संभाव्य कारवायांचा धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने “एसएफजे’वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे, असेही गृहमंत्रालयातील सूत्रांनी सांगितले.

“एसएफजे’ आणि या संघटनेच्या अनुयायांनी मिळून केलेल्या 2020 च्या जाहिरनाम्याला पाकिस्तानने पाठिंबा दिला आहे. “सिख फॉर जस्टीस’ आणि “2020 रेफरेन्डम’च्या संकेतस्थळांवर अत्यंत प्रक्षोभक आणि चिथावणीखोर मजकूर प्रसिद्ध केला जात आहे. ही संकेतस्थळे कराचीमधून चालवली जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)