बॅंकांना नाण्यांचे वावडे!

शाखा व्यवस्थापकाकडून खातेदारावरच गुन्हा दाखल करण्याची धमकी

तळेगाव  शाखेबाबत  तक्रारी  वाढल्या …

सोमवारी (दि. 22) दुपारी खातेदार सुशील ढोरे हे तळेगाव दाभाडे शाखेत गेले होते. त्यावेळी दहा रुपयांचे नाणे दुसऱ्या शाखेत घेतले जात नाही, त्यामुळे माझा वेळ आणि पैसे वाया गेला असल्याचे ढोरे यांनी शाखा व्यवस्थापक राजेंद्र कुमार राम यांना सांगितले. त्यावेळी बॅंकेतून जा नाही, तर गुन्हा दाखल करील, अशी धमकी दिली. या संदर्भात लहुजी शक्‍ती सेना पुणे जिल्हा युवक अध्यक्ष सचिन खिलारे यांनी शाखा व्यवस्थापक राजेंद्र कुमार राम यांना विचारणा केल्यावर उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच ग्राहकांच्या खात्यात पैसे असताना त्यांचे धनादेश बॉऊंस केले जात असून, ग्राहकांनाच अर्ज करण्यासाठी जबरदस्ती केली जाते.

तळेगाव दाभाडे – बॅंकांनी रिझर्व्ह बॅंकेकडून नाणी स्वीकारण्याचे निर्देश असताना ग्राहकांची नाणी स्वीकारण्यास बॅंका सहजासहजी तयार होत नाहीत. स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या तळेगाव दाभाडे शाखेत ग्राहक असलेल्या खातेदारांकडे दहा रुपयांची 500 नाणी अर्थात पाच हजार रुपये स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे ग्राहकाला मनस्ताप सहन करावा लागला.

बॅंक ऑफ इंडियाच्या तळेगाव दाभाडे शाखेत सोमवारी हा प्रकार घडला.सुशील ढोरे हे ग्राहक दहा रुपयांच्या नाण्याच्या स्वरूपात असणारी रक्‍कम घेऊन या शाखेत पोहोचले. सुशील ढोरे 500 नाणी होती. इतक्‍या मोठ्या संख्येने नाणी पाहून बॅंक कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. ही बाब बॅंकेच्या शाखा व्यवस्थापक राजेंद्रकुमार राम यांच्याकडे गेले. ग्राहक नाणी स्वरूपात पैसे बॅंकेतून घेत नसल्याने दहा रुपयांची नाणी घेणे टाळले जाते, असे सांगण्यात आले. वास्तविक, वैध चलन स्वीकारणे प्रत्येक बॅंकेला बंधनकारक आहे. नाणी स्वीकारण्यास नकार देणाऱ्या बॅंकांवर कारवाईचा इशारा दिला गेला आहे. या स्थितीत हा प्रकार घडल्याने सर्वत्र आश्‍चर्य व्यक्‍त केले जात आहे.

खातेदार सुशील ढोरे यांनी नाणी स्वीकारण्याचा आग्रह लावून धरला. मात्र व्यवस्थापक राम यांनी लोणावळा, देहुरोड व पिंपरी शाखेत नाणी जमा करण्याचा सल्ला दिला. ढोरे व्यवस्थापक राम यांना नाणी स्वीकारण्यास आग्रह करीत होते. मात्र त्यानंतर तुम्ही बॅंकेतून जा अन्यथा तुमच्यावर गुन्हा दाखल करून अशी धमकी दिली. स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या तळेगाव दाभाडे शाखेचे व्यवस्थापक राजेंद्र कुमार राम म्हणाले की, दहा रुपयांचे नाणे आमच्या शाखेत घेतले जात नाहीत. त्या नाण्यांचे त्यांनी दुसऱ्या शाखेत जमा करावे. माझ्यावरील आरोपांचे तथ्य नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

मुलाच्या शैक्षणिक प्रवेशासाठीचे शुल्क भरण्यासाठी मी मागील आठवड्यात येथील एसबीआय शाखेत आलो असता त्यांना 10 रुपयांची नाणे येथे स्वीकारली जाणार नाहीत, तुम्ही लोणावळा, देहुरोड किंवा पिंपरी शाखेत जावा, असा अजब सल्ला शाखा व्यवस्थापक राजेंद्र कुमार राम यांनी दिला. मुलाचे शैक्षणिक शुल्क भरण्याचा ताण असताना लोणावळा, देहूरोड, पिंपरी व तळेगाव दाभाडे या ठिकाणी चकरा माराव्या लागत आहेत.

– सुशील ढोरे, खातेदार, बॅंक ऑफ इंडिया.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)