विजया, देनासह बॅंक ऑफ बडोदाचे विलीनीकरण होणार

नवी दिल्ली – बॅंक कर्मचारी व अधिकाऱ्यांनी सरकारी बॅंकांच्या विलीनीकरणाला विरोध केला असतानाच या महिनाअखेर विजया बॅंक, देना बॅंक आणि बॅंक ऑफ बडोदाची विलीनीकरण प्रक्रिया पूर्ण होणार आहे. 8 जानेवारीला संसदेचे अधिवेशन सुरू होत असून बॅंकांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया त्यापूर्वी पार करणे सरकारला आवश्‍यक आहे.

विलीनीकरण्याच्या प्रक्रियेचे तीनही बॅंकांच्या संचालक मंडळाकडून कठोर परीक्षण होणार आहे. यामध्ये विलीनीकरण होताना बॅंकांच्या शेअरचा हिस्सा आणि लागणारे भांडवल याचा अभ्यास संचालक मंडळ करणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तीनही बॅंकांचे विलीनीकरण करण्यासाठी केंद्र सरकारने भांडवल देण्याचे आश्वासन दिले आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मोठी बॅंक करण्यासाठी सप्टेंबरमध्ये तीनही बॅंकाच्या विलीनीकरणाचा निर्णय घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)