डीएसके प्रकरणात बॅंक अधिकारीही सहभागी

ठेवीधारकांची महाराष्ट्र बॅंक मुख्यलयासमोर निदर्शने

बॅंकेने पैसे देण्याची तातडीने व्यवस्था करण्याची मागणी

पुणे – डीएसके यांच्या प्रकल्पात पैसे गुंतविलेल्या ठेवीदारांनी आज बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या मुख्य कार्यालयासमोर सोमवारी निदर्शने केली. यावेळी ठेवीदारांच्यावतीने एक निवेदन वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डीएसकेमध्ये पैसे गुंतविलेल्या ठेवीदारांना व्याजाचे पैसे मिळालेले नाहीत. त्याचबरोबर ठेवीच्या मुदती संपल्या, तरी अजून मूळ ठेवीसुद्धा मिळाल्या नसल्याने ठेवीदार अडचणीत आले आहेत. त्यात बहुसंख्य ठेवीदार हे ज्येष्ठ नागरिक आहे. निवृत्तीनंतर मिळालेले सर्व पैसे अनेकांनी डीएसकेमध्ये गुंतविले होते. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर आता डी. एस. कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. सध्या ते कोठडीत आहे. या प्रकरणाचा तपास करताना बॅंक ऑफ महाराष्ट्रने सुद्धा अनियमितपणे कर्ज दिल्याचे आढळून आले आहे.

कोट्यावधी रुपयांचे कर्ज बॅंकेने डीएसके यांना मंजूर केले आहे. बॅंकेची साथ असल्यामुळेच डीएसके यांना ऐवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्ज मिळाले आहे. ठेवीदारांना मात्र व्याजसुद्धा मिळालेले नाही. त्यामुळे अखेर सर्व ठेवीदारांनी बॅंकेच्या शिवाजीनगर येथील मुख्य कार्यालयासमोर निदर्शने केली. ज्येष्ठ ठेवीदार दीपक फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली ही निदर्शने करण्यात आली. यावेळी 50 ते 60 ठेवीदार उपस्थित होते.

याबाबत फडणीस म्हणाले, “आम्हाला डीएसकेकडून जे आगाऊ रकमेचे धनादेश मिळाले आहेत, ते सर्व बॅंक ऑफ महाराष्ट्राचे आहेत. पण, ते वटलेच जात नाहीत. बॅंकेने डीएसके यांना मोठ्या प्रमाणावर कर्ज दिले आहे. त्यामुळे बॅंकेतील अधिकारी सहभागी असल्याशिवाय हे घडू शकत नाही. याबाबत बॅंक अधिकाऱ्यांची तातडीने चौकशी व्हावी. तसेच आमचे पैसे बॅंकेने देण्याची व्यवस्था करावी,’ अशी मागणी केली आहे.”या प्रकरणावर निर्णय घेण्याचे अधिकार आमच्याकडे नाहीत. आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून येत्या चार ते पाच दिवसात निर्णय देऊ,’ असे बॅंक अधिकाऱ्यांनी सांगितले असे फडणीस म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)