बॅंक ऑफ इंडियात दक्षता सप्ताह

पुणे  – केंद्रीय दक्षता आयोगाच्या निर्देशानुसार, 29 ऑक्‍टोबर ते 3 नोव्हेंबर 2018 या काळात बॅंक ऑफ इंडियात, दक्षता जागरूकता सप्ताह 2018 साजरा करण्यात आला. त्यासाठी भ्रष्टाचार नष्ट करा – नवीन भारत तयार करा ही थीम होती.
त्यासाठी दिनांक 29.10.2018 रोजी बॅंक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी आंचलिक कार्यालय, शिवाजीनगर, पुणे येथे हातामध्ये भ्रष्टाचार नष्ट करा – नवीन भारत तयार कराचे नारे/स्लोगन बोर्ड घेऊन मानवी साखळी तयार केली होती.

ही मानवी साखळी बॅंकेच्या नॅशनल बॅंकिंग ग्रुप -पश्चिम विभाग-2, पुणे चे महाप्रबंधक अमित रॉय यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केली. सोबत राजेश इंगळे, आंचलिक प्रबंधक पुणे, तसेच सतर्कता विभाग- 2 पुणेचे सहाय्यक महाप्रबंधक बरून कुमार चक्रबर्ती होते.

बॅंकेच्या नॅशनल बॅंकिंग ग्रुप -पश्चिम विभाग-2, लक्ष्मी रोड, पुणे येथील कार्यालयामधून भ्रष्टाचार नष्ट करा – नवीन भारत तयार करा असा संदेश देणारा एक मोठा हिलीयम बलून आकाशामध्ये सोडण्यात आला. हा कर्मचारी आणि लोकांमध्ये जागरूकता करण्यासाठी चांगला प्रयत्न होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)