बांगला घुसखोरांनी भारतीय हद्दीत 16 नवीन गावे वसवली

मिझोरामच्या विधानसभेत सरकारची माहिती

ऐझॉल –
देशातील बांगला घुसखोरांची समस्या कायम असल्याचे मिझोराम सरकारने त्यांच्या विधानसभेत दिलेल्या माहितीवरून स्पष्ट झाले आहे. राज्य सरकारने सांगितले की बांगलादेशातून भारतीय हद्दीत घुसखोरी केलेल्या नागरीकांनी दक्षिण मिझोराम मध्ये सोळा नवीन खेडी वसवली आहेत.

स्थानिक प्रशासन मंत्री के लालरिलियाना यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की यातील चार खेडी ऐझॉल जिल्ह्यात, तीन खेडी चम्पई जिल्ह्यात आणि दोन खेडी मामित जिल्ह्यात वसवण्यात आली आहेत. घुसखोरांनी वसवलेल्या या जिल्ह्यांमध्ये केवळ बांगलादेशीच नव्हे तर म्यानमार, त्रिपुरा आणि मणिपुरच्या नागरीकांनीही आश्रय घेतल्याचे तपासात आढळून आले आहे. सीमावर्ती भागात त्यांचा वावर अधिक आहे असे ते म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)