#BANvWI 1st Test : बांगलादेशचा वेस्ट इंडीजवर 64 धावांनी विजय

नवी दिल्ली – बांगलादेश वि. वेस्ट इंडीज यांच्यातील दोन कसोटी क्रिकेट सामन्याच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशने वेस्ट इंडीजचा 64 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह बांगलादेश मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात बांगलादेशने 324 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीजचा संघ 246 धावसंख्याच उभारू शकला. त्यामुळे पहिल्या डावातील 78 धावांची आघाडी आणि दुसऱ्या डावातील 125 धावा याच्या जोरावर बांगलादेश वेस्ट इंडीज संघापुढे विजयासाठी 204 धावांचे आव्हान दिले होते.

-Ads-

दुसऱ्या डावात विजयासाठी 204 धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजचा संघ बांगलादेशच्या गोलंदाजीपुढे अक्षरक्षा गडगडला. वेस्ट इंडीजचा संघ सर्वबाद 139 धावांच करू शकल्याने त्यांना 64 धावांनी पराभव स्विकारावा लागला.

वेस्ट इंडीजकडून दुसऱ्या डावात सुनील अम्ब्रिसने 43 तर जोमेल वार्रिकनने 41 धावा केल्या. बांगलादेशकडून दुसऱ्या डावात तैजुल ईस्लामने 6 गडी बाद करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर पहिल्या डावात मोमिनुन हकने 120 धावा केल्या होत्या, त्याला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)