बांगलादेशचा वेस्टइंडीजवर एक डाव आणि 184 धावांनी विजय

मीरपूर – बांगलादेशच्या महमुदुल्लाह यांच्या 136 धावांच्या खेळीवर आणि मेहंदी हसनच्या 7 बळीच्या जोरावर बांगलादेशने दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटीत तिसऱ्याच दिवशी वेस्टइंडीजचा एक डाव आणि 184 धावांनी पराभव केला. या विजयासह बांगलादेशने दोन कसोटी क्रिकेट सामन्यांची मालिका 2-0 ने आपल्या नावे केली आहे.

बांगलादेशचा आजचा विजय हा एेतिहासिक ठरला. बांगलादेशने पहिल्यांदाच इतिहासात प्रतिस्पर्धी संघाविरोधात एका डाव आणि इतक्या मोठ्या फरकाने विजय प्राप्त केला आहे. मेहंदी हसन याने सामन्यात एकूण 12 बळी घेत सामनावीराचा किताब आपल्या नावे केला. तर शाकिब हसन याला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले.

बांगलादेशने प्रथम नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला होता. बांगलादेशने पहिल्या डावात 508 धावा केल्या होत्या. त्यानंतर वेस्ट इंडीज संघाने पहिल्या डावात सर्वबाद केवळ 111 धावांच केल्या. त्यामुळे बांगलादेशने वेस्टइंडीजला फाॅलोआॅन दिला. त्यानंतर दुसऱ्या डावात वेस्टइंडीजचा संघ 213 धावसंख्या उभारू शकला. त्यामुळे वेस्टइंडीजला एक डाव आणि 184 धावांनी पराभव स्विकारावा लागला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)