वेस्टइंडीज वि बांगलादेश पहिली कसोटी : पहिल्या दिवसअखेर बांगलादेश 8 बाद 315

नवी दिल्ली – वेस्टइंडीज आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्याच्या कसोटी क्रिकेट मालिकेला आजपासून सुरूवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना बांगलादेशातील जोहूर अहमद चौधरी मैदानावर सुरू आहे. पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर बांगलादेशने 8 बाद 315 धावा केल्या आहेत.

तत्पूर्वी बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशचा सलामीवीर सौम्य सरकार हा शून्यावरच बाद झाला. त्यानंतर मोमिनुल हक याच्या 120 आणि इमरूल केस याच्या 44 धावाच्या जोरावर बांगलादेशने पहिल्या दिवसअखेर 315 धावांपर्यत मजल मारली आहे.

पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा नईम हसन 24 तर तैजुल ईस्लाम हा 32 धावांवर खेळत होते. वेस्ट इंडिजकडून शैनन गेब्रिएलने 4, जोमेल वार्रिकनने 2 आणि देवेंद्र बिशु याने 1 गडी बाद केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)