#ICCWorldCup2019: बांगलादेशचा दक्षिण आफ्रिकेवर 21 धावांनी विजय

ओव्हल – मुस्तफ़िज़ुर रहमान आणि मोहम्मद सैफुद्दीन यांच्या प्रभावी व अचूक गोलंदाजीच्या जोरावर बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेचा 21 धावांनी पराभव केला आहे. विश्‍वचषक स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेचा हा दुसरा पराभव ठरला आहे. सलामीच्या लढतीत यजमान इंग्लंडकडून दक्षिण आफ्रिकेला पराभव स्विकारावा लागला होता.

विजयासाठी 331 धावांचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ 50 षटकांत 8 बाद 309 धावसंख्येपर्यतच मजल मारू शकला. आफ्रिकेकडून डुप्लेसीने ६२, ड्युमिनी आणि एडन यांनी प्रत्येकी ४५ तर वैन डर दुसें याने ४१ धावा केल्या. बांगलादेशकडून मुस्ताफिजुरने सर्वाधिक ३, सैफुद्दीनने २ तर मेहदी हसन आणि शाकिबने प्रत्येकी १ गडी बाद केला.

तत्पूर्वी आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याने टाॅस जिंकत प्रथम गोलंदाजी स्विकारत बांगलादेशला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 50 षटकांत 6 बाद 330 धावसंख्येपर्यत मजल मारली.

बांगलादेशकडून मुशफिकुर रहीमने सर्वाधिक 78 आणि शाकिब अल हसनने 75 धावा केल्या. याशिवाय महमूदुल्लाहने 46 तर सौम्य सरकार याने 42 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून फिरकीपटू इमरान ताहीरने 2 तर वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा आणि क्रिस माॅरिसने प्रत्येकी 2 गडी बाद केले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)