बांगलादेशात संसदीय निवडणुकांसाठी प्रथमच ईव्हीएमचा वापर

ढाका (बांगला देश) -बांगला देशातील संसदीय निवडणुकांसाठी या वर्षी प्रथमच ईव्हीएम (इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशीन)चा वापर करण्यात येणार आहे. बांगला देश निवडणूक आयोगाने मतदानाची तारीख जाहीर केली आहे. या निवडणुकीत ईव्हीएम चा वापर करण्यात येणार आहे.

सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यातील मतभेद चालू असतानाच निवडणूक आयोगाने 23 डिसेंबर ही मतदानाची तारीख जाहीर करून टाकली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त नूर-उल-हुदा यांनी टेलिव्हिजनवर प्रसारित एका निवेदनात ही तारीख जाहीर केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

चार निवडणूक आयुक्तांबरोबर झालेल्या चर्चेनंतर हुदा यांनी मतदानाची तारीख जाहीर केली. नवनिर्मित एनयूएफ (नॅशनल युनायटेड फ्रंट) ने तारीख बदलण्याची मागणी केली आहे, तर याच तारखेला मतदान घेण्यात यावे असे सरकारचे म्हणणे आहे. संविधानानुसार 28 तारखेपूर्वी निवडणुका घेणे अनिवार्य असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले होते.

निवडणूक प्रक्रिया लोकतांत्रिक नसल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. मात्र लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी आणि बांगला देशाच्या विकासाचे प्रयत्न चालू ठेवण्यासाठी सर्व पक्षांनी निवडाणुकीत भाग घ्यावा असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)