#Ban_Vs_Zim Test : झिम्बाब्वेचा 17 वर्षानंतर परदेशात कसोटी विजय 

सिलहट – ब्रेंडन मावुता आणि सिंकदर रजा यांच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर झिम्बाब्वेने पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा 151 धावांनी पराभव केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या फिरकीपटू ब्रेंडन मावुताने 21 धावा देत 4 गडी तर सिंकदर रजा याने 14 धावा देत 3 गडी बाद केले.

झिम्बाब्वे संघाची गेल्या पाच वर्षातील हा पहिला कसोटी विजय ठरला आहे. तर परदेशात तब्बल 17 वर्षानंतर झिम्बाब्वे संघाने आज कसोटी क्रिकेट सामन्यात विजय मिळविला आहे. शाॅन विलियम्सला सामनावीराचा किताब देण्यात आला आहे.

बांगलादेश संघाला सामन्याच्या चौथ्या दिवशी विजयासाठी 321 धावांचे आव्हान मिळाले होते. मात्र, बांगलादेशचा संघ सर्वबाद केवळ 169 धावांच करू शकला. वेलिंगटन मसाकाद्जा याने 2 गडी बाद केले. मसाकाद्जाने आरिफुल हक याला 38 धावांवर बाद करत बांगलादेश संघाचा शेवटचा गडी माघारी धाडत संघाला विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक :

झिम्बाब्वे वि. बांगलादेश (पहिला कसोटी सामना, चौथा दिवस)

झिम्बाब्वे पहिला डाव : 282/10(117.3)       बांगलादेश पहिला डाव : 143/10(51)
झिम्बाब्वे दुसरा डाव : 181/10(65.4)          बांगलादेश दुसरा डाव : 169/10(63.1)

झिम्बाब्वे संघाचा 151 धावांनी विजय

#Ban_Vs_Zim 1st Test : बांगलादेशपुढे 321 धावांचे आव्हान 

#Ban_Vs_Zim 1st Test : झिम्बाब्वे संघाकडे 140 धावांची आघाडी

#Ban_Vs_Zim 1st Test : पहिल्या दिवसअखेर झिम्बाब्वे 5 बाद 236


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)