#Ban_Vs_Zim 1st Test : बांगलादेशपुढे 321 धावांचे आव्हान 

सिल्हेट – बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्यातील दोन सामन्याच्या कसोटी क्रिकेट मालिकेच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर बांगलादेशने दुसऱ्या डावात नाबाद 26 धावा केल्या आहेत. बांगलादेशला विजयासाठी आणखी 295 धावांची आवश्यकता आहे.

दरम्यान पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी झिम्बाब्वे संघाला 140 धावांची आघाडी मिळाली होती. बांगलादेशचा पहिला डाव 143 धावांत संपुष्टात आल्यानंतर झिम्बाब्वेने दुसऱ्या डावात दुसऱ्या दिवसअखेरीस 2 षटकांत 1 धाव केली होती.

तिसऱ्या दिवशी पुढे खेळताना झिम्बाब्वेच्या संघाने दुसऱ्या डावात सर्वबाद 181 धावा केल्या. पहिल्या डावांतील 139 धावांची आघाडी आणि दुसऱ्या डावातील 181 धावा मिळून झिम्बाब्वेने बांगलादेशसमोर 321 धावांचे आव्हान उभे केले आहे. तिसऱ्या दिवसअखेर बांगलादेशने 26 धावा केल्या असून विजयासाठी आणखी 295 धावांची आवश्यकता आहे.

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेश संघाचे सलामीवीर लिटन दास हा 14 आणि इमरूल केस 12 धावांवर खेळत होते.

सक्षिंप्त धावफलक : बांगलादेश वि. झिम्बाब्वे – तिसरा दिवस.

बांग्लादेश दुसरा डाव 26/0(10.1), पहिला डाव 143/10.
झिम्बाब्वे पहिला डाव – 282/10, दुसरा डाव 181/10.

बांगलादेशला विजयासाठी आणखी 295 धावांची गरज.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)