#Ban_Vs_Zim 1st Test : झिम्बाब्वे संघाकडे 140 धावांची आघाडी 

सिल्हेट – बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्यातील दोन सामन्याच्या कसोटी क्रिकेट मालिकेला शनिवारी बांगलादेशमधील सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर सुरूवात झाली आहे. पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी झिम्बाब्वे संघाला 140 धावांची आघाडी मिळाली आहे. बांगलादेशचा पहिला डाव 143 धावांत संपुष्टात आल्यानंतर झिम्बाब्वेने दुसऱ्या डावात दुसऱ्या दिवसअखेरीस 2 षटकांत 1 धाव केली होती. दिवसअखेरीस हॅमिल्टन मसाकादजा 1 आणि ब्रायन चारी 0 धावांवर खेळत होते.

झिम्बाब्वे संघाने 5 बाद 236 धावसंख्येवरून दुसऱ्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला. तळाच्या फलंदाजांनी संघाच्या धावसंख्येत 46 धावांची भर टाकली. झिम्बाब्वेचा संघ पहिल्या डावात सर्वबाद 282 धावा करू शकला. त्यानंतर बांगलदेशच्या संघाने झिम्बाब्वे गोलंदाजीपुढे अक्षरक्षा लोंटागण घातले. बांगलादेशचा संघ पहिल्या डावात सर्वबाद 143 धावांच करू शकला. त्यामुळे झिम्बाब्वे संघाला 139 धावांची आघाडी मिळाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

झिम्बाब्वे संघाकडून टेंडाई चतारा आणि सिंकदर रजा यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. तर काईल जार्विस याने 2 आणि शाॅन विलियम्स याने 1 गडी बाद केला. बांगलादेश संघाकडून फलंदाजीत अरिफुल हकने सर्वाधिक 41 धावा केल्या. तर मुशफिकुर रहीम याने 31 आणि मेहंदी हसनने 21 धावा केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)