#Ban_Vs_Zim 1st Test : पहिल्या दिवसअखेर झिम्बाब्वे 5 बाद 236

सिल्हेट – बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्यातील दोन सामन्याच्या कसोटी क्रिकेट मालिकेला आज बांगलादेशमधील सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर सुरूवात झाली आहे. पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर झिम्बाब्वे संघाने 5 बाद 236 धावा केल्या आहेत.

नाणेफेक जिंकून झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. झिम्बाब्वे संघाचा सलामीवीर ब्रायन चारी हा 13 धावा आणि ब्रेंडन टेलर हा 6 धावा काढून झटपट बाद झाला. झिम्बाब्वे फलंदाजीमध्ये हॅमिल्टन मसाकादजाने 52, शाॅन विलियम्सने 88 तर सिंकदर रजा याने 19 धावा केल्या.पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा खेळपट्टीवर पीटर मूर 37 आणि रेगिस चकाब्वा 20 धावांवर टिकून आहेत. बांगलादेश गोलंदाजीत तैजुल ईस्लामने 2 तर अबू जायेद, नजमुल इस्लाम, महमूदुल्लाह यांनी प्रत्येकी 1 बळी घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)