#Ban_v_Zim 2nd Test : बांगलादेशचा झिम्बाब्वेवर 218 धावांनी विजय, मालिका बरोबरीत

मीरपूर – बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांच्यातील दोन सामन्याच्या कसोटी क्रिकेट मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशने झिम्बाब्वेचा 218 धावांनी पराभव केला आहे.या मालिकेतील पहिला सामना झिम्बाब्वे संघाने जिंकला होता, त्यामुळे ही कसोटी मालिका बरोबरीत सुटली आहे.

दुसऱ्या कसोटीत बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 7 बाद 522 धावसंख्या उभारत डाव घोषित केला होता. त्यानंतर झिम्बाब्वेने पहिल्याडावात 9 बाद 304 धावा केल्या होत्या. पहिल्या डावातील 218 धावांच्या आघाडीनंतर बांगलादेशने आपला दुसरा डाव 6 बाद 224 वर घोषित करून झिम्बाब्वे संघाला 442 धावांचे आव्हान दिले होते, मात्र झिम्बाब्वेचा संघ 9 बाद 224 धावांच करू शकला.

झिम्बाब्वे संघाचा गोलंदाज टेंडाई चतारा हा दुसऱ्या दिवशीच्या खेळादरम्यान गोलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाल्याने मैदानातून बाहेर गेला. दुखापत गंभीर असल्याने त्याला हा सामना अर्धवट सोडावा लागला. त्यामुळे त्याला दोन्हीही डावात फलंदाजी आणि गोलंदाजी करता आली नाही.

बांगलादेशच्या मुशफिकुर रहीमला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. मुशफिकुर रहीम याने पहिल्या डावात नाबाद 219 धावा केल्या होत्या.

बांगलादेशचा गोलंदाज तैजुल ईस्लाम याला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले. तैजुलने दुसऱ्या कसोटी सामन्यात एकूण 7 गडी बाद केले. अशी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)