#BANvWI Test : दुसऱ्या दिवसअखेर वेस्टइंडिजची  5 बाद 75 अशी बिकट अवस्था

बांगलादेश पहिला डाव 508; महमूदुल्लाहाची शतकी खेळी

मीरपूर – बांगलादेश आणि वेस्ट इंडिज याच्यांतील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना मीरपूर येथील बांग्ला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरील मैदानावर सुरू आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बांगलादेशचा पहिला डाव 508 धावसंख्येवर आटोपला. आज दिवसअखेर वेस्टइंडिज संघाच्या 5 बाद 75 धावा झालेल्या असून वेस्ट इंडिजचा संघ अजूनही 433 धावांनी पिछाडीवर आहे. बांगलादेश या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे.

-Ads-

बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारली होती.बांगलादेशकडून महमूदुल्लाहाने शतक साजरे करत सर्वाधिक 136 धावा केल्या. तर शाकिब अल हसनने 80, शदमन इस्लामने 76 आणि लिटन दासने 54 धावा केल्या.

वेस्ट इंडिज संघाकडून गोलंदाजीत केमार रोच, जोमेल वार्रिकन, देवेंद्र बिशू आणि क्रेग ब्रेथवेट यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. तर शेरमेन लुईस आणि राॅसटन चेज यांनी 1 गडी बाद केला.

सध्या वेस्टइंडिजचा शेन डाॅरिच 17 आणि शिमरोन हेट्मेयर 32 हे खेळपट्टीवर टिकून आहेत. वेस्टइंडिजचे सलामीवीर स्वस्तात बाद झाले. वेस्टइंडिजचे सलामीवीर क्रेग ब्रेथवेट हा शून्यावर तर काईरन पाॅवेल हा 4 धावावर बाद झाला. त्यानंतर आलेले फलंदाज सुनील अम्ब्रिस हा 7 तर राॅसटन चेज शून्यावर बाद झाला. शाइ होप हा फलंदाजही शाइ होप हाही 10 धावांवर बाद झाला. बांगलादेशकडून गोलंदाजीत शाकिब अल हसनने 2 तर मेहंदी हसनने 3 गडी बाद केले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)