कृषी क्षेत्रातील दूरशिक्षणाच्या पदवीला बंदी

नवी दिल्ली – विद्यापीठ अनुदान आयोगाने कृषी क्षेत्रातील दूरशिक्षणाच्या पदवीला बंदी घातली आहे. कृषी क्षेत्रातील पदवी कार्यक्रमाला प्रॅक्‍टिकल आणि प्रयोगशाळांतील प्रशिक्षणाची गरज असते. दूर शिक्षणात हे प्रशिक्षण मिळत नसल्याने त्या पदवी उपक्रमाला बंदी घालण्याचा निर्णय विद्यापीठ अनुदान आयोगाच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

हा विषय केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे आला होता त्यावेळी त्यांनी निर्णय घेण्यासाठी हा विषय विद्यापीठ अनुदान आयोगाकडे सुपुर्त केला होता. दूरशिक्षण उपक्रमात वैद्यकीय, अभियांत्रिकी, आर्किटेक्‍चर, नर्सिंग, डेंटल, फार्मसी, असे शिक्षण समाविष्ट करण्यात आलेले नाही. कृषी क्षेत्रातील पदवीसाठीही प्रयोगशाळांमध्ये बरेच तांत्रिक कार्य करणे आवश्‍यक असते त्यामुळे या क्षेत्रातील पदवी उपक्रमालाही बंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ही बंदी 2019 च्या नवीन शैक्षणिक वर्षापासून लागू राहणार आहे. महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, अन्नामलई विद्यापीठ, इग्नोयू, कुवेम्पु विद्यापीठ आणि नालंदा मुक्त विद्यापीठ अशा विद्यापीठांमध्ये दूरशिक्षणाद्वारे कृषी क्षेत्रातील पदवी व पदविका कोर्सेस चालवले जात होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)