ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेसाठीच्या बॉलबॉय निवडचाचणीत 100 मुलांचा सहभाग

नवी दिल्ली : आगामी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत बॉलबॉय बनण्याची संधी मिळावी याकरता देशातील विविध भागातून किया मोटर्स ऑस्ट्रेलियन ओपन 2019 साठी बॉल-किड्‌स कार्यक्रमा अंतर्गत 100 मुलांनी शनिवारी नवी दिल्लीतील आर. के. खन्ना स्टेडियमवर निवड चाचणीत सहभाग नोंदवला होता.

12 ते 15 वर्ष वयोगटातील मुलांची चाचणी दोन विशेषज्ञाच्या माध्यमातून घेण्यात येते. वर्षातील पहिल्या ग्रॅंडस्लॅमसाठी मध्ये सहभागी होण्यासाठी संधी मिळावी याकरता कोर्टवर आपले कौशल्य दाखवतात. या मुलांनी चेंडू पकडणे, खेळाडूंना चेंडू देणे, विश्रांती काळात खेळाडूंची काळजी घेणे आदि कौशल्य दाखवली.

भारताचा डेव्हिस चषक संघाचा कर्णधार महेश भूपती याच्या मार्गदर्शनाखाली 100 मुलांची निवड या चाचणीसाठी करण्यात आली होती.टेनिस ऑस्ट्रेलियाचे दोन अधिकारी यातून दहा मुलांची निवड करणार असून त्याची घोषणा पुढील महिन्यात पत्रकारपरिषदेत करण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)