पायाभूत चाचणी 28 ते 31 ऑगस्टला 

बालभारतीचे संचालक यांची माहिती; शिक्षक भारतीचा पाठपुरावा

नगर – राज्यातील इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी 28 ऑगस्ट घेण्यात येणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने ही चाचणी घेणार असल्याची माहिती शिक्षक भारतीचे नेते सुनील गाडगे यांनी दिली. 28 ते 31 ऑगस्टदरम्यान रोज एका विषयाचा पेपर होणार आहे. पहिलीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी घेण्यात येत नाही. मात्र अन्य दोन संकलित मूल्यमापनाच्या चाचण्या घेतल्या जातात. पायाभूतची चाचणी साधारणत: जुलै महिन्यात घेणे अपेक्षित होती. पंरतु काही तांत्रिक आडचणीमुळे यंदा ही चाचणी 28 ते 31 ऑगस्टदरम्यान घेण्यात येणार आहे, असे बालभारतीचे संचालक सुनील मगर यांनी सांगितले.

शिक्षक भारती संघटनेने आज त्यांची पुणे येथे शिक्षक नेते सुनील गाडगे यांच्या नेतृत्वाखाली कार्याध्यक्ष आप्पासाहेब जगताप,अहमदनगर महानगरचे जिल्हाध्यक्ष प्रदिप रुपटक्के, अहमदनगर महानगर महिला जिल्हाध्यक्ष माधवी भालेराव, हनुमंत रायकर, सुदाम दिघे, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लोंढे, जिल्हा सचिव मोहम्मद समी शेख, संभाजी चौधरी, उच्च माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरु, जिल्हा सचिव महेश पाडेकर, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, ग्रंथपाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास गाडगे,जिल्हा महिला अध्यक्षा आशा मगर, सचिव विभावरी रोकडे, संध्या गावडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, शकुंतला वाळुंज आदिंनी भेट बालभारतीचे संचालक यांची भेट घेऊन याविषयी चर्चा केली. सुनील मगर यांनी या चर्चेत सकारात्मक भाग घेत अनुकूलता दर्शवली.

चाचणीच्या प्रश्‍नपत्रिका देण्यात येणार आहेत. या परीक्षेदरम्यान शिक्षणाधिकाऱ्यांनी रोज किमान चार शाळांना भेटी देऊन त्यांच्याबाबतची माहिती आपल्या लॉगिंगवरुन भरावयाची आहे. वर्गशिक्षकांनी साधारण अठवडाभरात पेपर तपासून महा स्टुडंट ऍपच्या सहाय्याने ऍन्ड्रॉइड मोबाईलच्या सहाय्याने विद्यार्थ्यांने गुण अपलोड करायचे असल्याची माहिती सुनील मगर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)