मुख्यमंत्रीच चांगले पाहुणे – थोरात

माजी मंत्री थोरातांची पालकमंत्र्यांच्या सल्ल्यावर टिका

नगर  – माजी महसूल मंत्री तथा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे. राज्यात सर्वत्र दुष्काळ असल्याने आता कोणत्याही पाहुण्याकडे चारा व पाणी शिल्लक नाही. एकमेव मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर भरपूर पाणी आहे. तिथेच जनवारे नेऊन बांधा, अशी टिका थोरात यांनी पालकमंत्री शिंदे यांच्या सल्ल्यावर केली आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी “चारा पाणी नसेल तर, जनावरे पाहुण्यांकडे नेऊन घाला’, असा अजब सल्ला शेतकऱ्याला दिला आहे. चारा छाणवीवर बोलताना पालकमंत्री शिंदे यांच्या या सल्ल्यावर जिल्ह्यासह राज्यात पडसाद उमटू लागले आहेत. कॉंग्रेसचे माजीमंत्री थोरात नगर दौऱ्यावर आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पालकमंत्री शिंदे यांच्या या सल्ल्याकडे पत्रकारांनी थोरात यांचे लक्ष वेधले, असता थोरात यांनी शिंदे यांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला.

थोरात म्हणाले, “राज्यात सर्वत्र दुष्काळी परिस्थती निर्माण झाली आहे. सरकारकडून अद्याप एका रुपयाचीही मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. केंद्राच्या पथकांकडून जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्‍यांची पाहणी सुरू आहे. जिल्ह्यातील जनवारांचा चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यात पालकमंत्री प्रा. शिंदे शेतकऱ्यांना देत असलेले अजब सल्ले म्हणजे दुष्काळात शेतकयांच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे आहे.’


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
330 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
2 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)