बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीचा वाद अखेर संपुष्टात

मुंबई – बाळासाहेब ठाकरे यांच्या मत्यूपत्राला आव्हान देणारी याचिका जयदेव ठाकरे यांनी मागे घेतली आहे. तसेच हा खटला आणखी पुढे नेण्याची इच्छा नाही असे जयदेव ठाकरे यांनी मुंबई हायकोर्टाला कळविले आहे, त्यामुळे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपत्तीवरून सुरू असलेला वाद अखेर संपुष्टात आला आहे.

दरम्यान, बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर जयदेव ठाकरे यांनी त्यांच्या मृत्यूपत्रावर आक्षेप नोंदवला होता. मृत्यूपत्रारील स्वाक्षरीच्या तथ्यतेवर जयदेव यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

तसेच उध्दव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या आजारपणाचा फायदा उठवत त्यांची मालमत्ता हडप केल्याचा दावा करत जयदेव ठाकरे यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)