‘बालकस्नेही’च्या कामाला सुरुवात

मुंबई – लहान फिर्यादी मुले आणि साक्षीदार यांना एखाद्या गुन्ह्याबद्दल माहिती देताना अवघडल्यासारखे वाटू नये म्हणून सरकार राज्यभरात बालकस्नेही कोर्टरुम उभारणार असून त्यासाठी 82 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. हे विशेष कोर्टरुम उभारण्याच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिली. दक्षिण मुंबईतील सत्र न्यायालय आणि दिंडोशी येथे प्रायोगीक तत्वावर हे कोर्टरुम उभारण्यात येणार आहेत.

पॉक्‍सो कायदा, बालविवाहाविरोधातील कायदा तसेच बाल न्यायालयांमध्ये विविध कायदे पाळले जात आहेत कि नाही, त्याकडे लक्ष देण्याचे आदेश फेब्रुवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने देशातील प्रत्येक उच्च न्यायालयांना दिले होते. सुप्रीम कोर्टाच्या या आदेशासंदर्भात मुं बई उच्च न्यायालयाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली. मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर आज याप्रकरणी सुनावणी झाली.

मागील सुनावणीच्यावेळी न्यायालयाने सुरुवातीला शहरात तीन मॉडेल कोर्टरुम स्थापन करा व या कामाच्या अंमलबजावणास दिरंगाई होणार नाही याची दखल घ्या, असे राज्य सरकारला बजावले होते. त्यानुसार शहरात बालकस्नेही कोर्टरुम स्थापन करण्यासाठी 82 कोटीचा निधी मंजूर झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)