बजरंग पुनिया जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी

File photo

नवी दिल्ली – भारताचा आघाडीचा कुस्तीपटू बजरंग पुनिया याने शनिवारी आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम मानांकन प्राप्त करत 65 किलो वजनी गटात जागतिक क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे. यंदाच्या वर्षी बजरंग पुनियाने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करत 5 पदके जिंकली होती. त्यात राष्ट्रकुल स्पर्धा आणि आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक, तर जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धेत रौप्यपदक पटकाविले होते.

हे वर्ष बजरंगसाठी खूप यशस्वी ठरले आहे. तो बुडापेस्ट येथे झालेल्या स्पर्धेत मानांकन मिळालेला एकमेव भारतीय कुस्तीपटू होता. बजरंगने युनाइटेड वर्ल्ड रेस्टलिंग समितीने जाहीर केलेल्या यादीत 96 गुणांसह पहिले स्थान पटकाविले आहे. दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या क्‍युबाच्या अलेजांड्रो एन्रीक व्लाडेस तोबीअर हा 66 गुणांसह दुसर्या स्थानावर आहे. त्यामुळे तो मोठ्या गुणफरकासह पहिल्या स्थानावर आहे. बजरंगने बुडापेस्टमध्ये झालेल्या अटातटीच्या सामन्यात तोबीअर वर रोमांचकारी विजय मिळविला होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

युनायटेड वर्ल्ड रेसलिंग समितीने जाहीर केलेल्या यादीत बजरंग पुनिया पहिल्या क्रमांकावर आहे तर ऍलेक्‍झांडर तोबीअर दुसऱ्या क्रमांकावर असून रशियाचा अखमेद चाकेव्ह हा 62 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. जागतिक अजिंक्‍यपद स्पर्धा जिंकणारा ताकूतो ओतूगुरु हा 56 गुणांसह चौथ्या स्थानी आहे तर पाचव्या स्थानी तुर्कीचा सेलाहतीन आहे. बजरंग हा एकमेव भारतीय पुरुष कुस्तीपटू आहे जो पहिल्या दहा खेळाडूत आहे. परंतु, महिलांमध्ये पाच महिला खेळाडूंनी आपआपल्या वाजनीगटात पहील्या खेळाडुमधे स्थान पटकाविलेआहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)