भाद्रपद पोळ्यावर दुष्काळाचे सावट

File photo

श्रीगोंदा – तालुक्‍यातील बहुतांशी भागात भाद्रपद पोळा साजरा होत असतांना पोळ्यासाठी शेतकरी उत्साहात दिसत नाही. यंदा पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगाम कोरडा गेला आणि रब्बी हंगामाची सुरुवात झाली. पाऊस न झाल्याने अजुन रब्बी हंगामात ज्वारीच्या पेरण्या करण्यात आली नाही. या वेळेला बहुतांशी पेरण्या होत असतात, मात्र आता पाऊस नसल्याने या शेतीच्या पुरक असणाऱ्या बैल पोळ्यांवर दुष्काळाचे सावट आहे.

तालुक्‍यात भाद्रपद पोळा साजरा करण्यात आला. यासाठी गावागावात बैलांच्या वाजत गाजत मिरवणुका काढण्यात आल्या. तरुण शेतकरी आपल्या लाडक्‍या सर्जा राजाबरोबर सेल्फी काढून सोशल मिडियावर फोटो टाकत असल्याचे दिसले. सोमवारच्या आठवडे बाजारात शेतकऱ्यांनी पोळ्यासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी गर्दी केल. मात्र फारसा उत्साह जाणवला नाही. खरीप हंगाम कोरडा गेला. त्यात रब्बी हंगामाची सुरुवात झाली तरी पाऊस पडत नाही. याचे सावट या पोळ्यावर दिसत होते.

खेडे गावात संध्याकाळी गावागावात बैलांना सजुन त्यांच्या गळ्यात घुंगरमाळ घालून त्यांच्या अंगवार रंगबिरंगी झुल टाकून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आल्या. दुष्काळी परिस्थितीचा परिणाम बाजारपेठेवर जाणवत असला तरी शेतकरी आनंदी होते. मागील पाच वर्षापासून तालुक्‍यावर कमी आधिक पाऊस पडत आहे. त्यात यंदाचे दुष्काळाचे सावट असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. यावर्षी ही खरीप हंगामात पाऊस झाला नसल्याने बाजरी, कापूस यासह चारा पिकांच्या पेरण्या झाल्या नाही. मागील दहा पंधरा दिवसांपूर्वी तालुक्‍याच्या काही भागात पाऊस झाला मात्र तो पुरेसा नाही.

शेतकऱ्यांनी भाद्रपद पोळा या काळात येत असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या बैलांना विश्रांती देऊन त्यांची विशेष काळजी घेत सण साजरा केला. बाजारात पोळ्यानिमित्त बैलांच्या अंगावर, झूल, गोंडे, घुंगर माळा नाथ, गोंडे याशिवाय, बैलांच्या गळ्यात आकर्षक घुंगरांच्या माळा, पितळीचे शेंडे आणि घंटा घालून बैल मिरवणुकामध्ये सहभागी होते. परंतू शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)