बाहुबलीची आई राम्या कृष्णनन “पोर्न स्टार’च्या भूमिकेत 

“बाहुबली’ आणि “बाहुबली 2′ या दोन्ही सिनेमांमध्ये बाहुबलीची आई शिवगामीचा रोल साकारणारी रम्या कृष्णनन या दोन सिनेमांमुळे खूप लोकप्रिय झाली आहे. प्रभास, राणा दग्गुबत्ति आणि अनुष्का शेट्टी यांच्याबरोबर सत्यराज आणि राम्या कृष्णनन हे त्यांचे सहकलाकारही खूप लोकप्रिय झाले आहेत. ही राम्या कृष्णनन आपल्या आगामी सिनेमामध्ये चक्क “पोर्न स्टार’चा रोल साकारणार आहे.

मूळ तमिळमध्ये बनणाऱ्या या सिनेमाचे नाव “सुपर डिलक्‍स’ असे असणार आहे. त्यात राम्याने लिला नावाच्या एका प्रौढ आणि देहव्यापार करणाऱ्य महिलेचा रोल केला आहे. हा सिनेमा कलाकारांपेक्षा त्याच्या कंटेन्टमुळे विशेष आहे. तिचा रोल खूपच बोल्ड असणार आहे. या सिनेमाच्या शुटिंग दरम्यान डायरेक्‍टर कुमारराजा यांच्यामुळे राम्याला 2 मिनिटांच्या एका सीनसाठी तब्बल 37 वेळा रिटेक द्यावे लागले आहेअ, असे समजते अहे. काही रोल पैशांसाठी करावे लागतात, काही रोल पॉप्युलॅरिटीसाठी तर काही रोल केवळ पॅशन म्हणून करावे लागतात. अशापैकीच हा रोल आहे. हा रोल आपण केवळ पॅशन म्हणून केला, असेही राम्याने सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)