महावीर इंटरनॅशनलच्या उपाध्यक्षपदी बाफना; झोनल अध्यक्षपदी बरमेचा

सध्या शहरात दिडशेच्यावर वीर-वीरा सदस्य आहेत

नगर  – देश-विदेशात 480 हून अधिक केंद्राद्वारे चार दशकांहून अधिक काळ सेवाभावी सामाजिक कार्य करणाऱ्या महावीर इंटरनॅशनल या विश्‍वविख्यात संस्थेचे राष्ट्रीय उपाध्यक्षपदी संस्थापक चेअरमन व झोन चेअरमन रमेशचंद्र बाफना यांची निवड करण्यात आली. राष्ट्रीय अध्यक्ष एसके जैन व राष्ट्रीय महामंत्री डॉ. विनय शर्मा यांनी बाफना यांना नियुक्‍ती पत्र प्रदान केले. माजी अध्यक्ष, संस्थापक सदस्य व विद्यमान गव्हर्निंग कौन्सिल सदस्य गौतमलाल बरमेचा यांना अहमदनगर-औरंगाबाद झोनल चेअरमनपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. बाफना यांचेवर मुंबई, गुजराथ व औरंगाबाद संभागाची जबाबदारी राहील.

केवळ 15 सदस्यांनी प्रारंभ झालेल्या महावीर इन्टरनॅशनल चे सध्या शहरात 150 वीर वीरा सदस्य आहेत. या संभागात नवीन केंद्र व सदस्य वृध्दीसाठी आपण सर्व सदस्यांचे सोबत राहून मोठे कार्य करु असा विश्‍वास बाफना, बरमेचा यांनी व्यक्‍त केला. नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या भव्य राष्ट्रीय अधिवेशनात नगर केंद्राला व वीर-वीरा सदस्यांना विविध पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले. बाफना व बरमेचा यांचे समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)