कुमारांच्या बॅडमिंटन स्पर्धेस आजपासून प्रारंभ

हैदराबाद – लहान गटापासून बॅडमिंटनसाठी नैपुण्यशोध घेण्याच्या दृष्टीने आयोजित केलेल्या कुमारांच्या अखिल भारतीय स्तरावरील बॅडमिंटन स्पर्धेस 9 जुलैपासून चंडीगढ येथे प्रारंभ होत आहे. ही स्पर्धा 9, 11, 13, 15 व 17 वर्षांखालील श्रेणींमध्ये होणार आहे. भारतीय बॅडमिंटन महासंघाच्या मान्यतेने ही स्पर्धांची मालिका होईल.

ऑलिंपिक रौप्यपदक विजेती पी. व्ही. सिंधू ,माजी राष्ट्रीय विजेते व प्रशिक्षक विमलकुमार यांच्या उपस्थितीत या उपक्रमांची घोषणा करण्यात आली. ही स्पर्धा 10 शहरांत खेळली जाणार आहे. गतवर्षी या स्पर्धेत 8 हजार खेळाडूंनी भाग घेतला होता. यंदाही तसाच प्रतिसाद अपेक्षित आहे.

बॅडमिंटनपटू पी. व्ही. संधू यांनी सांगितले, या खेळाने अलीकडच्या काळात मिळवलेले विजेतेपद व गौरव यामुळे हा खेळ घराघरात पोहोचला आहे. अधिक गुणवान खेळाडू घडवण्यासाठी आणखी प्रयत्न होणे आवश्‍यक आहे. म्हणूनच, तळागाळापासून उत्तेजन देणे गरजेचे आहे. या खेळामध्ये उतरताना नव्या खेळाडूंसमोर येणारी सर्वात मोठी अडचण म्हणजे, योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शन यांचा अभाव. या स्पर्धेमुळे नवोदित खेळाडूंना या खेळातील दिग्गजांकडून योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळेल. गुणवान खेळाडूंसाठी पोषक वातावरण व व्यवस्था निर्माण करण्यासाठी व त्याद्वारे त्यांना व्यावसायिक खेळ म्हणून बॅडमिंटनची निवड करण्यास उत्तेजन मिळेल.

या स्पर्धेचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे: दि.9 ते 12 जुलै-चंडीगढ, दि.21 ते 25 जुलै-मुंबई, दि.27 ते 31 जुलै- पुणे, दि.2 ते 5 ऑगस्ट-कोची, दि.7 ते 11 ऑगस्ट- बंगळुरू, दि.10 ते 13 ऑगस्ट- गुवाहाटी, दि.16 ते 20 ऑगस्ट हैदराबाद, दि.19 ते 22 ऑगस्ट-अहमदाबाद, दि.30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर-लखनौ, 3 ते 7 सप्टेंबर-नवी दिल्ली, दि.9 व 10 सप्टेंबर-अंतिम फेरी-नवी दिल्ली

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here