बॅडमिंटन स्पर्धा : कॉमेट्‌स, स्वान्स व किंगफिशर संघांचे विजय

सहावी पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धा

पुणे: कॉमेट्‌स संघाने किंगफिशर संघाचा, स्वान्स संघाने स्पुटनिक्‍स संघाचा, तर किंगफिशर संघाने स्पुटनिक्‍स संघाचा पराभव करताना सहाव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत आगेकूच केली. पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा पीवायसी हिंदू जिमखाना येथील बॅडमिंटन कोर्टवर सुरू आहे.

-Ads-

या स्पर्धेतील गटसाखळी फेरीत कॉमेट्‌स संघाने किंगफिशर संघाचा 4-3 असा पराभव केला. कॉमेट्‌स संघाकडून पराग चोपडा, संग्राम पाटील, सुधांशु मेडसीकर, हर्षवर्धन आपटे, आनंद शाह, विमल हंसराज, अविनाश दोशी व विवेक जोशी यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत संघाला विजय मिळवून दिला. दुसऱ्या सामन्यात स्वान्स संघाने स्पुटनिक्‍स संघाचा 4-3 असा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.

विजयी संघाकडून अमोल मेहेंदळे, सुदर्शन बिहाणी, आदित्य काळे, सारंग लागू, बिपीन चोभे, सारा नवरे, मनीष शाह व प्रीती सप्रे यांनी संघाला विजय मिळवून दिला. त्यानंतर अन्य लढतीत किंगफिशर संघाने स्पुटनिक्‍स संघाचा 4-3 असा पराभव करताना स्पर्धेत आगेकूच केली.

सविस्तर निकाल-

गट साखळी फेरी – कॉमेंट्‌स विजयी विरूद्ध किंगफिशर 4-3 (गोल्ड खुला दुहेरी गट: पराग चोपडा व संग्राम पाटील वि.वि. अद्वैत जोशी व संतोष पाटील 21-12, 21-20; सिल्व्हर खुला दुहेरी: विनीत रुकारी व राजशेखर करमरकर पराभूत विरूद्ध मिहीर विंझे व करण पाटील 21-13, 21-15; गोल्ड खुला दुहेरी: सुधांशु मेडसीकर व हर्षवर्धन आपटे वि.वि. नकुल दामले व मकरंद चितळे 21-17, 21-17; सिल्व्हर खुला दुहेरी: आनंद शाह व विमल हंसराज वि.वि. शिवकुमार मेनन व अश्विन त्रिमल 15-8, 15-7; गोल्ड मिश्र दुहेरी: अनिकेत सहस्रबुद्धे व अवनी देशमुख पराभूत विरूद्ध तन्मय चोभे व वृषी फुरीया 1-21, 4-21; सिल्व्हर मिश्र दुहेरी – जनक वाकणकर व भाग्यश्री देशपांडे पराभूत विरूद्ध. गायत्री वर्तक व अभिजित राजवाडे 15-11, 15-11; 49 वर्षांवरील दुहेरी: अविनाश दोशी व विवेक जोशी वि.वि. प्रशांत कुलकर्णी व अनिल आगाशे 21-7, 21-9);

स्वान्स विजयी विरूद्ध स्पुटनिक्‍स 4-3 (गोल्ड खुला दुहेरी:

आर्य देवधर व तेजस चितळे पराभूत विरूद्ध सिद्धार्थ निवसरकर व सिद्धार्थ साठ्ये 21-19, 18-21, 9-11; सिल्व्हर खुला दुहेरी: अमोल मेहेंदळे व सुदर्शन बिहाणी वि.वि.आशुतोष सोमण व तुषार मेंगाळे 21-14, 21-13; गोल्ड खुला दुहेरी: आदित्य काळे व सारंग लागू वि.वि. अनिरुद्ध आपटे व रणजित पांडे 15-21, 21-16, 11-10; सिल्व्हर खुला दुहेरी: चिन्मय चिरपुटकर व देबश्री दांडेकर पराभूत विरूद्ध मिहीर आपटे व आमोद प्रधान 14-15, 8-15; गोल्ड मिश्र दुहेरी: बिपीन चोभे व सारा नवरे वि.वि. गोपिका किंजवडेकर व शैलेश लिमये 21-13, 21-10; सिल्व्हर मिश्र दुहेरी: मनीष शाह व प्रीती सप्रे वि.वि. प्रीती फडके व जयदीप कुंटे 15-13,8-15 11-5; 49वर्षांवरील दुहेरी: निलेश केळकर व डॉ नरेंद्र पटवर्धन पराभूत विरूद्ध. बाळ कुलकर्णी व अनिल देंडगे 14-21, 10-21)
किंगफिशर वि.वि स्पुटनीक्‍स- 4-3( गोल्ड खुला दुहेरी: मकरंद चितळे व नकुल दामले वि.वि रणजीत पांडे व अनिरुद्ध आपटे 12-21, 21-14, 11-7; सिल्व्हर खुला दुहेरी- अद्वैत जोशी व संतोष पाटील वि.वि आशुतोष सोमन व तुषार मेंगळे 21-9, 21-11; गोल्ड खुला दुहेरी: तन्मय चोभे व मिहिर विंझे वि.वि सिध्दार्थ साठे व सिध्दार्थ निवसरकर 15-21, 21-15,9-11; सिल्व्हर खुला दुहेरी- अभिषेक ताम्हाणे व अनया तुळपुळे पराभूत वि आमोद प्रधान/मिहिर आपटे 13-15, 15-12, 10-11; गोल्ड मिश्र दुहेरी: करण पाटील/गायत्री वर्तक वि.वि शैलेश लिमये व गोपिका किंजवडेकर 21-7, 21-12; सिल्व्हर मिश्र दुहेरी: अभिजीत राजवाडे व वृषाली फरिया वि.वि जयदीप कुंटे व प्रीती फडके 15-6, 15-11; 49 वर्षांवरील दुहेरी- अनिल आगोशे/चारूदत्त साठे पराभूत वि बाळ कुलकर्णी व अनिल देडगे 8-21, 10-21).

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)